01 March 2021

News Flash

दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर येतोय ‘सुखी माणसाचा सदरा’

भरत जाधव मालिकेत चिमणच्या भूमिकेत दिसणार आहे.

सुखाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते. कोणासाठी पावसाची पहिली सर, तर कोणासाठी पावसाळ्यात मिळणारी सुट्टी, कोणासाठी सोनचाफ्याचा सुवास तर कोणासाठी तेच फूल बायकोच्या केसात माळणं, कोणी कुटुंबामध्ये आनंद शोधतं तर कोणी कुटुंबाला आनंदी ठेवण्यासाठी झटत असतं. आपण नेहमीच ऐकतो की सुखी माणसाचा सदरा हा प्रत्येकालाच हवा असतो पण तो दुर्मिळ नाही, प्रत्येक माणूस तो त्याच्याकडे असलेल्या धाग्यांमधून विणू शकतो आणि हेच गमक आचारणात आणून आपलं आयुष्य जगणारे चिमणराव आणि त्यांचं सुखी कुटुंब दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

केदार शिंदे (स्वामी क्रिएशन्स) निर्मित आणि दिग्दर्शित ‘सुखी माणसाचा सदरा’ २५ ऑक्टोबर रात्री ९.३० वाजता आणि २६ ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता कलर्स मराठीवर येत आहे. केदार शिंदे या मालिकेद्वारे छोट्या पड्यावर पुनरागमन करणार असून महाराष्ट्राचा लाडका अभिनेता म्हणजेच भरत जाधव मालिकेत चिमणच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, श्रुजा प्रभुदेसाई, विजय पटवर्धन हे कलाकार मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत आहेत.

आणखी वाचा : “तुम्ही मुकेश अंबानींसोबत डेटवर जाता का?”; नीता अंबानींनी दिलं हे उत्तर

नात्यांचे बंध, एकत्र कुटुंब, आपल्या माणसांवरील प्रेम, हे सध्या कुठेतरी हरवत चाललं आहे. प्रत्येक माणूस सुखाच्या शोधात आहे. पण याविरुध्द चिमणराव आणि त्यांची बायको कावेरी आणि त्यांचा संपूर्ण परिवार त्यांच्याकडे जे आहे त्यामध्ये सुखी आहेत. चिमण आणि त्याच्या कुटुंबाकडे रूढार्थाने सगळी सुखं नाहीये पण त्यांनी तो आनंद, सुख एकमेकांमध्ये शोधलं आहे. म्हणूनच कुठल्याही संकंटावर ते हसतहसत मात करतात, वेळेला एकमेकांना आधाराचा हात देतात, वेळ पडली तर कानउघडणी करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 1:34 pm

Web Title: sukhi mansacha sadra new marathi serial starting from dasara ssv 92
Next Stories
1 जेव्हा रेखा-काजोल यांच्या बोल्ड फोटोशूटची झाली जोरदार चर्चा
2 ‘केआरकेला व्हायचंय मुलगी’; ट्विटमुळे होतेय सोशल मीडियावर चर्चा
3 थाटात पार पडलं चिरंजीवी सरजाच्या पत्नीचं डोहाळ जेवण; दिराने दिलेल्या गिफ्टची सोशल मीडियावर चर्चा
Just Now!
X