News Flash

कपिलच्या एक्स-गर्लफ्रेंडसोबत सुनील ग्रोवर करणार नवीन शो?

कपिलनेही तिच्यासोबतचे सारे संबंध संपल्याचे स्पष्ट केले होते

कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील वाद आता नवीन राहिला नाही. त्यांचे विमानातील भांडण तिथे कमी आणि सोशल मीडियावरच जास्त रंगवले गेले. आता मीडिया रिपोर्टनुसार, सुनील ग्रोवरने प्रिती सिमोनसोबत एकत्र काम करण्याची तयारी दर्शवली आहे. सुनीलने त्याच्या एका ट्विटमध्ये म्हटले की, देवाच्या कृपेने एक नवीन शो मिळाला आहे, ज्यात तो लवकरच दिसेल. सुनीलने या शोसाठी प्रिती सिमोनसोबत हात मिळवणी केली आहे. प्रितीशिवाय तिची बहिण नीतीही या शोमध्ये दिसणार आहे.

असेही म्हटले जाते की, सुनील ग्रोवरचा हा नवीन शो कपिल शर्माच्या शोपेक्षा जास्त मनोरंजक आहे. कपिलच्या मागील दोन कार्यक्रमांना जेवढा चांगला प्रतिसाद मिळाला होता तेवढा चांगला प्रतिसाद मात्र फॅमिली टाइम शोला मिळत नाहीये. एका इंग्रजी वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, कपिल आणि प्रीती गेल्याच वर्षी व्यावसायिक आणि खासगी आयुष्यातून एकमेकांपासून दूर गेले होते. एवढेच नाही तर कपिल आणि सुनीलमध्ये जे भांडण झाले होते ते भांडण खरं तर प्रीती आणि कपिलच्या भांडणापासूनच सुरू झालं होतं. कपिलनेही प्रीतीसोबतचे सारे संबंध संपल्याचे स्पष्ट केले होते.

कपिल शर्माच्या शोमधून काढता पाय घेतल्यानंतर सुनील छोट्या पडद्यापासून दूरच आहे. तरीही तो अनेक ठिकाणी लाइव्ह परफॉर्मन्स देताना दिसतो. पण सुनील कधीही कपिलच्या शोमध्ये परत गेला नाही. त्यामुळए सुनीलचा नवा शो काही कमाल करु शकणार की नाही हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे असेल यात काही शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2018 4:19 pm

Web Title: sunil grover ready to make a comeback with kapil sharma ex girlfriend preeti simon
Next Stories
1 Video : हॉलिवूडच्या ‘या’ सुपरस्टारने केला रोबोट सोफियाला किस करण्याचा प्रयत्न !
2 ‘बागी २’ ने मोडला ‘पद्मावत’चा हा रेकॉर्ड
3 सावधान : तैमूरचे फोटो वापरताय? कायदेशीर कारवाईची शक्यता
Just Now!
X