19 January 2021

News Flash

उपचारांसाठी मित्राला आर्थिक साहाय्य करा, सनीचं सोशल मीडियाद्वारे आवाहन

तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे त्यात तिनं तिचा मित्र प्रभाकर याला आर्थिक साहाय्य करण्याचं आवाहन केलं आहे.

सनी लिओनी

सनी लिओनी ही अशी व्यक्ती आहे की तिच्यासारखं होणं भारतीय महिला कधीही पसंत करणार नाही, अशा शब्दात सनीच्या बॉयोपिक सिरिजमध्ये तिची ओळख करून दिली होती. पण पॉर्नस्टारपलिकडे तिची वेगळी ओळख आहे. साधरण दीड वर्षांपूर्वी सनीनं एका गरीब अनाथ मुलीला दत्तक घेऊन तिला नवं आयुष्य दिलं होतं. तिच्या या निर्णयाचं सगळ्यांनीच खूप कौतुक केलं. आता सनीनं आणखी एक कौतुकास्पद पाऊल उचललं आहे. किडनी निकामी झाल्यानं सनीचा एक मित्र सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याचं संपूर्ण कुटुंब एकट्याच्या कमाईवर अवलंबून आहे. मात्र आता तोच मृत्यूंशी झुंजत असताना त्याच्या उपचारासाठी मदत करण्याचं आवाहन सनीनं तिच्या चाहत्यांना केलं आहे.

तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे त्यात तिनं तिचा मित्र प्रभाकर याला आर्थिक साहाय्य करण्याचं आवाहन चाहत्यांना केलं आहे. ‘प्रभाकर आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे. माझ्या अनुपस्थितीत तो माझ्या टीमची आणि मुलांचीही काळजी घेतो. माझ्या मुलांसाठी तो मामासारखाच आहे. मात्र आता प्रभाकरची तब्येत बिघडली आहे. प्रभाकरची किडनी निकामी झाली तो एका रुग्णालयात उपचार घेत होता. तिथे त्याच्यावर योग्य उपचार झाले नाही. त्यांनी प्रभाकरचा जवळजवळ जीवच घेतला होता. पण सुदैवानं आम्हाला प्रभाकरच्या प्रकृतीबद्दल कळलं आणि आम्ही त्याला योग्य ठिकाणी दाखल केलं.

प्रभाकार घरातील एकमेव कमावता आहे त्याच्या घरात त्याची वृद्ध आई, बायको आणि मुलं आहेत. आर्थिक परिस्थिती बेताची आहे. तो उपचारांचा खर्च एकटा उचलू शकत नाही. त्यामुळे त्याला आर्थिक साहाय्य करावं असं तिनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2018 5:12 pm

Web Title: sunny leone write post on instagram and ask donation for her friend in need
Next Stories
1 Home Sweet Home : रिमा लागू यांच्या शेवटच्या चित्रपटाची झलक पाहिली का?
2 अॅमेझॉन प्राइम ओरिजिनलवर लवकरच येणार ‘कॉमिकस्तान’चा दुसरा सिझन
3 मायदेशी परतताच ‘देसी गर्ल’ भावुक, म्हणते…
Just Now!
X