News Flash

सुशांतच्या बहिणीने शेअर केली ‘ती’ शेवटची पोस्ट

म्हणाली, "यापुढे तुला कधीही बघता येणार नाही..."

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला आता १० महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. पण अजूनही त्याचे कुटुंबिय या दुःखातून सावरलेले नाहीत. सुशांतच्या बहिणीने नुकतीच एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. यात सुशांतने त्याच्या मृत्यूच्या काही दिवसांअगोदरच शेअर केलेल्या शेवटच्या पोस्टचा स्क्रीनशॉट तिने जोडला आहे. हा स्क्रीनशॉट शेअर करताना बहिण श्वेता सिंह किर्तीने इमोशनल पोस्ट लिहीलीय.

भाऊ सुशांत सिंह राजपूतची आठवण काढत श्वेता सिंह किर्ती म्हणाली, “भावाची शेवटची पोस्ट…तुला यापुढे कधी बघता येणार नाही हा विचार करूनच खूप त्रास होतोय…हे दुःख तुकड्यांमध्ये कसं आपल्याला विखरवू शकतं… आपण या तुकड्यांना एकत्र करायला जावू, जमा करालया जावू, तेव्हा आपल्याला कळतं की हे शक्य नाही…”

मृत्यूच्या काही दिवसांपुर्वी शेअर केलेला आईसोबतचा फोटो
सुशांतने त्याच्या मृत्यूच्या एक आठवड्यापुर्वीच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आईसोबतचा एक फोटो कोलाज करुन शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने ‘माँ’ असं लिहिलं होतं. या फोटोला कॅप्शन देताना त्याने लिहिले की, ‘भूतकाळाच्या आठवणी अंश्रूवाटे वाहत आहेत. अपूर्ण स्वप्न आणि उद्याची आशा या दोघांमध्ये आयुष्य वाटाघाटी करत आहे. #आई’

सुशांतची शेवटची इन्स्टा पोस्ट ठरलेल्या या फोटोचा स्क्रीनशॉट काढून बहिण श्वेताने पुन्हा एकदा सुशांतच्या आठवणी शेअर केल्या आहेत. १४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूतच्या राहत्या घरी वांद्रे येथे पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह अढळून आला. या प्रकरणाची ईडी चौकशी देखील झाली. या प्रकरणाच ड्रग्स कनेक्शन असल्याचं देखील समोर आलं. दुसरीकडे सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी वडिल आणि त्याच्या बहिणी कार्यरत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 3:42 pm

Web Title: sushant singh rajput sister shweta shared the last post of sushant prp 93
Next Stories
1 आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीला करोनाची लागण, पोस्ट शेअर करत म्हणाली…
2 श्रवण यांच्या निधनानंतर नदीम यांची ‘ती’ इच्छा राहिली अपूर्ण
3 Oscar 2021: ऑस्कर विजेत्याने मानले पालकांचे आभार, कारण वाचाल तर हैराण व्हाल
Just Now!
X