News Flash

Sushant Suicide Case: “किती दिवस पळणार? एक दिवस थकून मरशील”

अभिनेत्याने रियावर केली जोरदार टीका

रिया सुशांतच्या आयुष्यात आल्यापासून त्याचं घराच्यांशी बोलणं कमी झालं होतं, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी आणि जवळच्या लोकांनी केलं होतं. सुशांत कुटुंबीयांशी व मित्रांशी कमी बोलायचा. तसेच तो वारंवार फोन नंबरही बदलायचा, असंही त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं होतं.

अभिनेता सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांकडून सुरू असतानाच सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात पोलीस तक्रार दाखल केली. या तक्रारीमुळे संपूर्ण तपासाला आता वेगळं वळण लागलं आहे. दरम्यान या प्रकरणावर अभिनेता अध्ययन सुमन याने प्रतिक्रिया दिली आहे. तू किती पळणार आहेस? एक दिवस थकून मरशील, असं म्हणत त्याने रिया चक्रवर्तीवर जोरदार टीका केली.

अवश्य पाहा – Sushant Suicide Case: “असत्याचा पराभव निश्चित”; अभिनेत्याचं रियाच्या वकिलांना आव्हान

“रिया तुझं खरं रुप आता लवकरच जगासमोर येईल. तू या प्रकरणातून पळू शकतेस पण किती दिवस पळणार? एक दिवस थकून मरशील. मला माहिती आहे चुकीच्या लोकांची साथ देणं किती त्रासदायक ठरतं.” अशा आशयाचं ट्विट करुन अध्ययनने रिया विरोधात संताप व्यक्त केला आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून आहे.

अवश्य पाहा – Sushant Suicide Case: खरंच रिया चक्रवर्ती फरार आहे का? पाटणा पोलीस म्हणाले…

सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात मंगळवारी रात्री पाटणा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं. त्यात सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी इंडिया टुडेशी बोलताना मुंबई पोलिसांना आधीच माहिती दिली होती, असा दावा केला आहे. “सुशांतच्या कुटुंबीयांनी मुंबईतील वांद्रे पोलिसांना २५ फेब्रुवारी रोजी याची माहिती दिली होती. सुशांत चुकीच्या लोकांच्या संगतीत आहे. या प्रकरणात पोलिसांनी लक्ष घालावे, जेणेकरून त्याचं नुकसान होणार नाही. ही माहिती पोलिसांना देण्यात आली तेव्ही सुशांत पूर्णपणे रिया चक्रवर्तीच्या नियंत्रणाखाली गेलेला होता,” असं सिंह म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 1:27 pm

Web Title: sushant singh rajput suicide case rhea chakraborty adhyayan suman mppg 94
Next Stories
1 प्रसिद्ध संगीतकाराला बलात्काराच्या आरोपाखाली २४ वर्षांची शिक्षा
2 कार्तिकीच्या साखरपूड्याचा सैराट व्हिडीओ व्हायरल
3 सुशांतच्या खात्यातून खरंच १५ कोटी काढले गेले होते का? CA म्हणाले…
Just Now!
X