‘स्वराज्यरक्षक संभाजी’ व ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकांमध्ये भूमिका साकारणारा अभिनेता प्रशांत लोखंडे याचे निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्रशांतचे निधन झाले. झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत प्रशांतने अब्दुल्ला दळवी ही भूमिका साकारली होती. १४ सप्टेंबर रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला. प्रशांतच्या निधनाने मनोरंजन सृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.
‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत त्याने बाजी घोरपडे ही भूमिका साकारली होती. तर ‘मोलकरीण बाई’ या मालिकेतही तो झळकला होता. ‘स्वराज्यजननी जिजामाता’ आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकांची निर्मिती करणाऱ्या ‘जगदंब क्रिएशन्स’च्या इन्स्टाग्राम पेजवर प्रशांतचा फोटो पोस्ट करत त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्रशांत लोखंडे …
खुपच धक्कादायक बातमी… intercollegiate एकांकिकापासून स्पर्धेपासून पाहतोय..
मेहनती, हरहुन्नरी कलाकार…
मित्रा… अजूनही विश्वास बसत नाहीय…
भावपूर्ण श्रद्धांजली pic.twitter.com/9dsj3mD2dB
— SIDDHARTH JADHAV (@SIDDHARTH23OCT) September 14, 2020
अभिनेता सिद्धार्थ जाधवनेही सोशल मीडियावर पोस्ट लिहित श्रद्धांजली वाहिली. ‘खूपच धक्कादायक बातमी. कॉलेजमधील एकांकिका स्पर्धेपासून पाहतोय. मेहनती, हरहुन्नरी कलाकार…मित्रा..अजूनही विश्वास बसत नाहीये. भावपूर्ण श्रद्धांजली,’ अशा शब्दांत सिद्धार्थने भावना व्यक्त केल्या.