01 December 2020

News Flash

‘प्यार हुआ इक़रार हुआ…’; टप्पूच्या स्वॅगवर बबिता झाली फिदा

‘तारक मेहता’मधील ‘या’ भाभी बरोबर होतेय टप्पूच्या अफेअरची चर्चा

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील बबिता उर्फ अभिनेत्री मुनमुन दत्ता सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. मुनमुनने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंवरुन टप्पू उर्फ अभिनेता राज अनादकटने तिची फिरकी घेतली आहे. ‘तारक मेहता’मधील या दोन कलाकारांची अनोखी जुगलबंदी सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – अभिनेत्रीनं शेअर केले न्यूड फोटो; कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक

काय म्हणाला टप्पू?

मुनमुनने राजसोबतचा एक फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोवर तिने “प्यार हुआ इक़रार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल” अशी गंमतीशीर कॉमेंट लिहिली आहे. तिच्या या फोटोवर राजने “हेहेहेहे… खुप छान फोटो आहे” अशा आशयाची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची ही अनोखी जुगलबंदी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. मुनमुन आणि राज दोघांमध्येही खुप चांगली मैत्री आहे. दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या पार्श्वभूमीवर बबीता टप्पूला डेट करतेय की काय? अशी चर्चा देखील चाहत्यांमध्ये सुरु असते.

अवश्य पाहा – हे १० चित्रपट कधीही लहान मुलांसोबत पाहू नका; कारण…

अवश्य पाहा – १४ वर्षांची असताना माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले; आमिर खानच्या मुलीचा गौप्यस्फोट

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. गोकूलधाम नावाच्या एका सोसायटीमध्ये घडणाऱ्या गंमती जंमती या मालिकेमध्ये दाखवल्या जातात. लॉकडाउनच्या काळातही या विनोदी मालिकेची लोकप्रियता बिलकूल कमी झालेली नाही. किंबहूना TRPच्या बाबतीत ‘रामायण’, ‘महाभारत’ या मालिकेशी तारक मेहता स्पर्धा करताना दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 11:39 am

Web Title: taarak mehta ka ooltah chashmahs munmum dutta raj anadkat mppg 94
Next Stories
1 Exclusive : मालिका पुढे चालवायची म्हणून अशा नराधमांना पाठिशी घालणं चुकीचं- प्राजक्ता गायकवाड
2 नसीरुद्दीन शाह यांच्या मुलाला करोनाची लागण
3 वादग्रस्त वक्तव्यांमुळे नव्हे, तर ‘या’ कारणामुळे होते कंगनाची चर्चा
Just Now!
X