02 March 2021

News Flash

तैमुरच्या एका फोटोची किंमत माहीत आहे का?

सेलिब्रिटींपेक्षा तैमुरच्या फोटोची किंमत जास्त

तैमुर

‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटातून कलाविश्वात पुनरागमन करणारी अभिनेत्री करिना कपूर-खानचा लाडका लेक तैमूर जन्माला आल्यापासून स्टारडम उपभोगत आहे. आपल्या आई-वडिलांप्रमाणेच आता त्यालाही कॅमेराची आणि प्रसारमाध्यमांची सवय झाली असून तो हसतहसत त्यांना सामोरा जातो. त्यामुळे सध्या तो स्टारकिडच्या यादीत अग्रस्थानावर आहे. त्याचे स्टारडम हे कोणत्याही सुपरस्टारपेक्षा कमी नाही. सोशल मीडियावर त्याच्याबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या जातात तर क्षणार्धात त्याचे सुंदर फोटो व्हायरल होतात. पण तैमुरच्या एका फोटोची किंमत तुम्हाला माहीत आहे का?

तैमुरच्या एका फोटोसाठी फोटोग्राफर्स १५०० रुपये आकारतात असं खुद्द सैफ अली खानने सांगितलं आहे. इतकंच नव्हे तर ही रक्कम कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटीपेक्षा जास्त असल्याचं तो सांगतो. सैफने ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये नुकतीच हजेरी लावली होती. या शोमध्ये त्याने अनेक मजेशीर गोष्टी सांगितल्या.

 

तैमुर कुठेही दिसला तरी प्रसारमाध्यमांच्या नजरा त्याच्याकडेच वळतात. सैफ आणि करिना जरी त्याच्यासोबत असले तरी चर्चा फक्त तैमुरचीच होते. तैमुरची प्रसारमाध्यमांमध्ये असणारी क्रेझ पाहता करिना आणि सैफने त्याला यापासून दूर नेण्याचा निर्णय घेतल्याचं सैफने काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. तैमुरभोवती असणाऱ्या माध्यमांच्या गराड्यामुळे त्याचं बालपण हरवू नये म्हणून त्याला इंग्लंडमधील एका चांगल्या बोर्डिंग स्कूलमध्ये घालणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2018 4:19 pm

Web Title: taimur ali khan pictures worth more than any other superstar in bollywood saif ali khan answers
Next Stories
1 शाहरुख, ए. आर. रहमान म्हणतायत ‘जय हिंद!’
2 आलिया म्हणते, आता माझ्या लग्नाची वाट पाहा!
3 करिनाशी लग्नाच्या दिवशी पूर्वाश्रमीची पत्नी अमृताला लिहीलं होतं पत्र- सैफ
Just Now!
X