‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम बबीता म्हणजेच अभिनेत्री मुमुन दत्ताच्या अडचणी थांबण्याच नाव नाही. काही दिवसांपूर्वीच मुनमुनने जातीवाचक शब्दांचा उल्लेख करत अपमानजनक वक्तव्य केलं होतं. हे वक्तव्य मुनमुनला आता महागात पडलं आहे.

हरियाणामधील हांसी शरहात मुनमुनविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नॅशनल अलायंल फॉर दलित ह्यूमन राईटस् चे कार्यकर्ते रतज कलसन यांनी मुनमुन विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत मुनमुनवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याने तिच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. देशीतील विविध शहरांमध्ये तिच्याविरोधात गुन्हे दाखल होत आहेत.

जालंधरमध्ये देखील दलित संघटनांनी एकत्र येत मुनमुनविरोधत गुन्हा दाखल केला असून लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केलीय. मुनमुनवर अजामीनपात्र गुन्हा दाखल गुन्हा दाखल झाल्याने अटक झाल्यास तिला जामीन मिळू शकत नाही. काही दिवसांपूर्वी मुनमुनने सोशल मीडियावर एक व्हि़डीओ शेअर केला होता. या व्हिडीओमुळे या संपूर्ण प्रकरणाला तोंड फुटलं.

मुनमुने शेअर केलेल्या व्हिडीओत तिने जातिवाचक शब्दांचा वापर करत समाजातील ठराविक समूहाचा अपमान केला होता. यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या. या व्हिडीओत ती म्हणाली, “‘मी लवकरच यूट्यूबर दिसणार आहे. त्यासाठी मला सुंदर दिसायचं आहे. मला ** सारखं दिसायचे नाही’ . हा व्हि़डीओ पाहून सोशल मीडियावर संताप व्यक्त होऊ लागला.

मुनमुन दत्ताचा माफीनामा
यानंतर मुनमुनने एक पोस्ट शेअर करत माफीदेखील मागितली होती. यासंदर्भात मुनमुनने ट्विटरद्वारे माफी मागितली आहे. ‘हे मी काल पोस्ट केलेल्या एका व्हिडीओ संदर्भात आहे. या व्हिडीओमध्ये मी वापरलेल्या शब्दाचा वेगळा अर्थ काढला जात आहे. कोणाच्या भावना दुखावण्यासाठी किंवा धमकी देण्याचा माझा हेतू नव्हता. माझ्या भाषेच्या अडथळ्यामुळे मला या शब्दाबद्दलचे चुकीचे ज्ञान होते. मला या शब्दाचा अर्थ कळताच मी व्हिडीओमधून तो भाग काढून टाकला. मी प्रत्येक जात, पंथ आणि लिंगाच्या व्यक्तींचा आदर करते. समाजात किंवा राष्ट्रासाठी त्यांचे अपार योगदान आहे याची मी कबुली देते.” असं ती य़ा पोस्टमध्ये म्हणाली होती.

मुनमुनने माफी मागून देखील तिच्यावर कारवाईची मागणी केली जातं आहे. मुनमुन दत्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत ती चाहत्यांशी संवाद साधत असते.