News Flash

लॉकडाउनमध्ये झी मराठीवर दोन नवीन मालिकांची पर्वणी

वैभव मांगले नव्या भूमिकेत

लॉकडाउनमध्ये चित्रीकरणाची परवानगी जरी मिळाली असली तरी चित्रीकरण सुरू होण्यासाठी काही काळ जाईल. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या मालिकांचे नवीन भाग पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी थोडा वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. या दरम्यान, डिजिटल आशय निर्मितीतून मनोरंजन करणे शक्य असल्याने झी मराठी वाहिनीवर ‘होम मिनिस्टर घरच्याघरी’ आणि ‘घरात बसले सारे’ यासारख्या आणखी काही घरच्या घरी चित्रित केलेल्या मालिकांची पर्वणी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

‘एक गाव भूताचा’ आणि ‘टोटल हुबलाक’ या आणखी दोन नवीन मालिका लॉकडाउनच्या काळात ‘झी मराठी’वर पाहायला मिळणार आहेत. ‘एक गाव भूताचा’या या मालिकेचे लेखन ‘राजू घाग’ यांनी केले असून यात वैभव मांगले मुख्य भूमिकेत आहेत. तर लेखक आणि निर्माता तेजपाल वाघ याने त्याच्या ‘लागीरं झालं जी’ मालिकेतील भैय्यासाहेब, टॅलेन्ट आणि राहुल्या या तिघांना घेऊन ‘टोटल हुबलाक’ ही मालिका केली आहे.

‘टोटल हुबलाक’ ही मालिका १५ जूनपासून रात्री ८.३० वाजचा तर ‘एक गाव भुताचा’ ही मालिका १८ जूनपासून रात्री ९ वाजता प्रेक्षक झी मराठीवर पाहू शकतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 4:06 pm

Web Title: two new marathi serials begin soon on zee marathi ssv 92
Next Stories
1 ‘ही’ अभिनेत्री एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी घेते इतके पैसे; कमाई जाणून व्हाल थक्क!
2 ‘बालाजी प्रोडक्शन’ आर्थिक संकटात?; बॅक स्टेज कर्मचाऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा
3 गांधी-गोडसे एकाच फोटोमध्ये; राम गोपाल वर्मांविरोधात संताप
Just Now!
X