News Flash

VIDEO : जेव्हा सुपरस्टार रजनीकांत यांना पहिल्यांदा भेटला होता सुशांत सिंह राजपूत…; अशी होती ‘थलाइवा’ची प्रतिक्रिया

सुपरस्टार रजनीकांतना भेटल्यानंतर सुशांतच्या चेहऱ्यावरचा तो आनंद स्पष्टपणे झळकत होता. कारण सुशांत हा सुपरस्टार रजनीकांत यांचा मोठा फॅन होता.

(File PTI photo) Sushant Singh Rajput and MS Dhoni with Superstar Rajinikanth in Chennai.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला १४ जून रोजी एक वर्ष पूर्ण होतंय. पण तरीही सुशांत आता आपल्यात राहिला नाही हे स्विकारणं सुशांतचे मित्र, फॅन्स आणि इतर सेलिब्रिटींना अवघड जातंय. सुशांतच्या मृत्यूवेळी अनेक प्रश्न निर्माण झाले, त्याच आधारे सीबीआयने सुशांतच्या मृत्यूबाबत तपास सुरू केला तो आतापर्यंत सुरूच आहे. सुशांत सिंह एक खुल्या मनाचा आणि मनसोक्त जगणारा व्यक्ती होता. ज्या ज्या व्यक्तीशी तो भेटत असे त्या प्रत्येक व्यक्तीशी तो सन्मानानेच वागत होता. जेव्हा तो त्याच्या फॅन्सना भेटत असे त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद झळकत होता. त्याची ती स्माईल आजही लोकांच्या मनात बसली आहे.

रजनीकांत यांचा मोठा फॅन होता सुशांत सिंह राजपूत

सगळेच जण सुशांतची आठवण काढत आहेत आणि त्याच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसून येत आहेत. अशातच सुशांतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रडंच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये सुशांत सिंह राजपूत, भारतीय क्रिकेट टीमचा माजी कप्तान महेंद्र सिंह धोनी आणि सुपरस्टार रजनीकांत हे तिघे दिसून येत आहेत. सुपरस्टार रजनीकांत यांना पहिल्यांदा भेटल्यानंतर सुशांतच्या चेहऱ्यावरचा तो आनंद स्पष्टपणे झळकत होता. याचं कारण ही तसंच आहे. सुशांत हा सुपरस्टार रजनीकांत यांचा मोठा फॅन होता.

सोशल मीडियावर व्हारयल होत असलेला हा व्हिडीओ ‘एम.एस.धोनी’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा आहे. या चित्रपटात सुशांतने धोनीची भूमिका साकारली होती आणि हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू भाषेत रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान महेंद्र सिंह धोनी हा सुपरस्टार रजनीकांत यांना भेटण्यासाठी गेला होता आणि त्याच्यासोबत सुशांत देखील चेन्नईत पोहोचला होता.

या व्हिडीओमध्ये स्वतः महेंद्र सिंह धोनी त्याच्या चित्रपटाबद्दल रजनीकांत यांना माहिती देतोय. त्यावेळी या चित्रपटात धोनीची भूमिका कोण करतंय, असं रजनीकांत यांनी धोनीला विचारलं. यावर धोनीने सुशांतकडे इशारा केला. यावर रजनीकांत यांनी हसत हसत सुशांतची माफी मागितली आणि म्हणाले, “या चित्रपटाबाबत मला कोणतीही माहिती नव्हती, त्यामुळे धोनीची भूमिका कोण करतंय हे मला माहित नव्हतं.”

ज्यावेळी रजनीकांत यांनी सुशांतकडे पाहिलं त्यावेळी सुशांतच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून आला. सुशांतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’मध्ये त्याने इमॅन्युअल राजकुमार ज्यूनिअरची भूमिका साकारली. त्यात सुद्धा तो सुपरस्टार रजनीकांत यांचा मोठा फॅन असल्याचं दाखवण्यात आलंय. खऱ्या आयुष्यात सुद्धा सुशांत रजनीकांत यांचा मोठा फॅन होता आणि त्यांचा तो खूप आदर करत होता.

‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ सुशांतच्या करियरमधला मोठा टर्निंग पॉईंट ठरला होता. याच चित्रपटाने सुशांतला रातोरात स्टार बनवलं होतं. या चित्रपटानंतर त्याच्यापूढे बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. या चित्रपटात सुशांतसोबत दिशा पटानी, कियारा आडवाणी आणि अनुपम खेर दिसून आले होते.

देशातील मोठ्या यंत्रणांनी तपास करूनही सुशांतने आत्महत्या केली का त्याची हत्या झाली? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे. हे प्रकरण आता सीबीआयकडे तपासासाठी असल्याने पुढे सीबीआय काय निष्कर्षापर्यंत पोहोचतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2021 9:38 pm

Web Title: when sushant singh rajput met with superstar rajinikanth video goes viral on social media prp 93
Next Stories
1 ‘खिलाडियों का खिलाडी’मध्ये अक्षय कुमारने ‘द अंडरटेकर’ हरवलं नव्हतं तर…
2 ‘धूम-4’ सिनेमात अक्षय कुमार आणि सलमान खान झळकणार ?; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
3 सुशांत सिंह राजपूतच्या निधनामुळे ‘द फॅमिली मॅन’च्या जेके तळपदेचं स्वप्न राहिलं अपूर्ण
Just Now!
X