आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी सोशल मीडियावर झाली होती. याचा परिणाम ‘लाल सिंग चड्ढा’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होताना दिसत आहे. आमिर खान ते करीना कपूरने या चित्रपटावर बहिष्कार न घालण्याची विनंती केली. पण बॉयकॉटच्या मागणीसोबतच या चित्रपटाला विरोधही केला जात आहे. आता यावर चित्रपटातील अभिनेत्री मोना सिंगने प्रतिक्रिया दिली आहे.

मोना सिंगने आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटात त्याच्या आईची भूमिका साकारली आहे. ११ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित झाला मात्र त्याआधीपासू सोशल मीडियावर #BoycottLaalSinghChaddha ट्रेंड होत होता. आमिर खानने काही वर्षांपूर्वीच केलेल्या काही वक्तव्यांचा आधार घेत त्याच्या चित्रपटाच्या विरोधात हा हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला होता. यावर आता मोना सिंगने नाराजी व्यक्त केली आहे. मागच्या ३० वर्षांपासून जी व्यक्ती प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे तिच्याच विरोधात आता अशाप्रकारचा ट्रेंड चालवला जाणं चुकीचं असल्याचं मोना सिंगनं म्हटलं आहे.
आणखी वाचा- “खूप काही सांगायचं राहून गेलं…” मावशीच्या निधनानंतर अमृता खानविलकरची भावूक पोस्ट

‘इंडिया टुडे’ बोलताना मोना सिंग म्हणाली, “मला खूप दुःख होतं. म्हणजे आमिर खानने नेमकं असं काय केलंय जे त्याच्याशी सर्वजण अशाप्रकारे वागत आहेत. मागच्या ३० वर्षांपासून तो सर्वांचं मनोरंजन करतोय. पण मला पूर्ण विश्वास आहे की, हा चित्रपट जेव्हा प्रत्येक भारतीय व्यक्तीला आवडतोय असं या बॉयकॉट करणाऱ्या लोकांना समजेल तेव्हा ते सुद्धा हा चित्रपट पाहतील.”

आणखी वाचा- ‘फॉरेस्ट गंप’ आणि ‘लाल सिंग चड्ढा’मधल्या ‘या’ दृश्यांमधील साम्य ठाऊक आहे का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटात काम केल्याने मोना सिंगला बरंच ट्रोल करण्यात येत आहे. आमिरपेक्षा वयाने लहान असूनही ती या चित्रपटात त्याच्या आईची भूमिका साकारताना दिसत आहे. यावर उत्तर देताना मोना सिंग म्हणाली, “मी या चित्रपटात आमिर खान नाही तर ‘लाल’ या व्यक्तिरेखेच्या आईची भूमिका साकारली आहे.” दरम्यान या चित्रपटाचं दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केलं असून यात दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.