अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांची मुलगी न्यासा देवगण सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांचा संपर्कात राहते. मागच्या काही वर्षांत अनेक स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. त्यामुळे न्यासा बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. शिवाय याबाबतची विचारणा अजय देवगण आणि काजोलला होत. नुकतंच अजयला न्यायासाच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत विचारण्यात आलं, तेव्हा अजयने काय उत्तर दिलं पाहुयात.

हेही वाचा – “आमिर खान अतिशय फालतू…”; बॉयकॉट ‘लाल सिंग चड्ढा’ मोहिमेचं समर्थन करत संतापले मुकेश खन्ना

मुलगी न्यासाच्या डेब्यूबद्दल बोलताना अजयने खुलासा केला की, “ती अजून टीनएजर आहे. तिने काजोल किंवा मला तिच्या करिअरचा शेवटचा पर्याय कोणता असेल, हे अजून सांगितलेलं नाही. सध्या ती परदेशात शिक्षण घेत आहे. जर तिने चित्रपटसृष्टीत करिअर करायचे ठरवले तर ती तिची निवड असेल. पालक म्हणून आम्ही तिला नेहमीच पाठिंबा देऊ,” असं अजय हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

हेही वाचा – साऊथच्या ‘या’ सहा चित्रपटांशिवाय कोणते चालले? आर माधवनने उपस्थित केला सवाल

याआधी मुलीच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल बोलताना अजय देवगण म्हणाला होता की, “मला माहीतच नाही की, तिला या क्षेत्रात यायचं आहे की नाही. अद्याप तिनं या क्षेत्रात येण्यासाठी कोणत्याही प्रकारची रुची दाखवलेली नाही. पण मुलांसोबत अनेक गोष्टी अचानक बदलतात. त्यामुळे भविष्यात काहीही होऊ शकतं. सध्या ती परदेशात असून आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करत आहे.”

हेही वाचा – “आपण चुकीचा चित्रपट…”; बॉयकॉट ट्रेंडनंतर ‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप झाल्याबद्दल आर. माधवनने मांडलं स्पष्ट मत

दरम्यान, येत्या काळात अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, निर्माते बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूर, अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर आणि अमिताभ बच्चन यांची नात अगस्त्य नंदा लवकरच फिल्मी दुनियेत पाऊल ठेवणार आहे.

हेही वाचा – Photos: मलायका अरोराने सुरू केला नवा बिझनेस; लाँचिंग इव्हेंटला बॉलिवूडकरांची हजेरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजय देवगणच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो इंद्र कुमारच्या ‘थँक गॉड’ मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रकुल प्रीतसोबत दिसणार आहे. हा चित्रपट 2022 च्या दिवाळीत रिलीज होईल. तसेच त्याच्या ‘मैदान’ या चित्रपटाची निर्मिती पूर्ण झाली आहे, पण त्याची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही.