scorecardresearch

“आज त्यांना चारतोस आणि उद्या…”, बकऱ्यांना गवत चारतानाचा व्हिडीओ शेअर केल्यामुळे अक्षय कुमार ट्रोल

अक्षयचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

akshay kumar, akshay kumar troll,
अक्षयचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षय कुमार सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्काक राहतो. नुकताच अक्षयने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. दरम्यान, अक्षयला अनेकांनी ट्रोल देखील केले आहे.

अक्षयने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. अक्षय या व्हिडीओत काही बकऱ्यांना गवत चारताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत, “छोट्या छोट्या गोष्टीतच मोठा आनंद मिळतो…आपण देवाकडे आणखी काय मागू शकतो? आपल्याला हा निसर्ग पाहायला मिळाला आणि आपण इथे जिवंत आहोत त्या प्रत्येक दिवसासाठी देवाचे आभार मानतो”, असे कॅप्शन अक्षयने दिले आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला अक्षयच्या ‘केसरी’ या चित्रपटातील ‘तेरी मिट्टी’ हे गाणं प्ले होतं आहे. अक्षयचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. काही नेटकऱ्यांनी अक्षयला आज तू त्या बकऱ्यांना गवत चारत आहेस उद्या त्यांना खाणार अस म्हणत ट्रोल केले आहे.

आणखी वाचा : “…कारण माझे ब्रेस्ट मोठे नाहीत”, नीना गुप्ताच्या उत्तराने कपिल शर्माची बोलती बंद

आणखी वाचा : “माझ्या भावांनी हिंदूशी लग्न केले”, मानहानीच्या दाव्यावर सलमानच्या वकीलांनी दिली उत्तर

दरम्यान, अक्षयने अलीकडेच त्याच्या ‘बच्चन पांडे’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले. हा चित्रपट १८ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. अक्षय सध्या ‘OMG 2’ आणि ‘राम सेतू’ या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय अक्षय ‘रक्षाबंधन’, ‘सिंड्रेला’, ‘डबल एक्स एल’, ‘ड्रायव्हिंग लायसन्स’, ‘राऊडी राठौर २’ मध्ये दिसणार आहे. तर या आधी त्याचा ‘सुर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Akshay kumar fed grass to goats with his own hands got trolled dcp

ताज्या बातम्या