“बॉलिवूडने महान कोरिओग्राफर गमावला”; अक्षय कुमार सरोज खान यांच्या निधनामुळे दु:खी

“दिवसाची सुरुवात एक वाईट बातमीनं झाली”

सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचं शुक्रवारी पहाटे निधन झालं. त्या ७१ वर्षांच्या होत्या. कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांचं निधन झालं. दरम्यान बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने त्यांना ट्विटरद्वारे श्रद्धांजली अर्पण केली आहे. एका वाईट बातमीनं आजचा दिवस सुरु झाला. असं म्हणत त्यानं दु:ख व्यक्त केलं आहे.

“महान कोरिओग्राफर सरोज खान यांच निधन झालं. एका वाईट बातमीनं आजचा दिवस सुरु झाला आहे. त्या डान्स इतक्या सोप्या पद्धतीने शिकवायच्या की डान्स करु शकेल. बॉलिवूडसाठी हा एक झटका आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, ही प्रार्थना!” अशा आशयाचे ट्विट करुन अक्षय कुमारने सरोज खान यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

गेल्या बऱ्याच काळापासून सरोज खान बॉलिवूडपासून दूर होत्या. परंतु २०१९ मध्ये मल्टिस्टारर चित्रपट ‘कलंक’ आणि कंगना रनौतच्या ‘मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटात एक गाणं कोरिओग्राफ केलं होतं. सरोज खान या हिंदी सिनेसृष्टीतल्या नावाजलेल्या कोरिओग्राफर होत्या. एक दो तीन.. हे गाणं असो किंवा हमको आज कल है इंतजार.. या गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. इतकंच नाही तर चोली के पिछे क्या है.. निंबुडा निंबुडा, डोला रे डोला या गाण्यांचंही नृत्य दिग्दर्शन सरोज खान यांनी केलं. मिस्टर इंडिया, चांदनी, बेटा, तेजाब, नगिना, डर, बाझीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, देवदास, ताल, फिजा, स्वदेस, तनू वेड्स मनू, एजंट विनोद, रावडी राठोड, मणिकर्णिका, या आणि अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी नृत्य दिग्दर्शन केलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Akshay kumar saroj khan made dance look easy mppg