Alia Bhatt Look Leaked From Love and War : ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटातील आलिया भट्टचा फर्स्ट लूक लीक झाला आहे. आलिया भट्टचा हा लूक १९६० आणि १९७० च्या दशकाची आठवण करून देतो. अभिनेत्रीने सुंदर सिल्व्हर कलरची साडी परिधान केली आहे आणि केसांना क्लासिक लूक दिला आहे. प्रेक्षक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत, ज्यामध्ये आलिया भट्ट, रणबीर कपूर व विकी कौशल मुख्य भूमिकेत आहेत. आलियाच्या लूकमुळे चाहते तिच्या भूमिकेबद्दल गोंधळलेले आहेत.
चित्रपटाचा पहिला लूक कधी प्रदर्शित होणार याबद्दल सोशल मीडियावर बराच काळ चर्चा सुरू होती. पण प्रेक्षकांना आलिया भट्टचा पहिला लूक अशा प्रकारे पाहायला मिळेल, असा कोणी विचारही केला असेल. चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, हा एक लव्ह ट्रँगल चित्रपट आहे, ज्यामध्ये रणबीर कपूर आणि विकी कौशल वायुसेनेतील अधिकाऱ्यांच्या भूमिकेत आहेत. संजय लीला भन्साळी यांच्या या आगामी चित्रपटाची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.
आलिया भट्टचा पहिला लूक संपूर्ण चित्रपट किती आकर्षक असेल हे दाखवण्यासाठी पुरेसा आहे. सोशल मीडियावर नेटकरी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत. एका व्यक्तीने “खूप उत्साहित”, अशी कमेंट केली. तर दुसऱ्याने लिहिले, “खूप सुंदर दिसत आहेस.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, “ती नकारात्मक भूमिका साकारणार आहे का?”
‘लव्ह अँड वॉर’ कधी प्रदर्शित होणार?
सोशल मीडियावर आलिया भट्टच्या या व्हायरल फोटोंवर अशाच प्रकारच्या अनेक कमेंट्स आल्या आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शन तारखेबाबत, प्रेक्षकांना अजून थोडी वाट पाहावी लागेल. वृत्तानुसार, निर्मात्यांना अजून बरेच काम करायचे आहे. संजय लीला भन्साळी हा चित्रपट २० मार्च २०२६ च्या आसपास प्रदर्शित करू शकतात.
रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट प्रचंड चर्चेत असतात. दोघांचे एकमेकांवर किती प्रेम आहे हे अनेकदा दिसून आले आहे. दोघेही चाहत्यांना कपल्स गोल देताना दिसतात. ही लोकप्रिय जोडी सध्या त्यांच्या नव्या बंगल्यामुळेदेखील चर्चेत आहे. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या त्यांच्या या घराचे काम आता पूर्ण झाले आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर येत्या दोन दिवसांत कपूर कुटुंब नव्या घरी शिफ्ट होणार आहे.