१० वर्षांपूर्वी केलेल्या ‘त्या’ ट्वीटमुळे बिग बींना आजही केले जाते ट्रोल

या ट्वीटमध्ये त्यांनी अंतर्वस्त्रांचा उल्लेख केला होता.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत ब्लॉग, ट्वीट्स, फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असल्यामुळे चर्चेत असतात. मात्र यावेळी बिग बी त्यांच्या जुन्या ट्वीटमुळे चर्चेत आले आहेत. त्यांच हे ट्वीट त्यावेळी प्रचंड व्हायरल झाले होते.

अमिताभ यांचे व्हायरल झालेल हे ट्वीट १० वर्ष जुने आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी स्त्रीयांच्या अंतर्वस्त्राचा उल्लेख केला होता. अजूनही त्यांना या ट्वीटमुळे ट्रोल केले जाते. आता कोणीतरी त्यांच हे १० वर्ष जुने ट्वीट शोधून व्हायरल केलं आहे. “इंग्रजी भाषेमध्ये ब्रा हा शब्द एकवचनी तर पॅण्टी हा शब्द अनेकवचनी का आहे?” असे अमिताभ यांनी त्या ट्वीटमध्ये म्हटले होते.

२०१० मध्ये केलेल्या या ट्वीटमुळे बिग बींना आजही नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, तुमच्या सारख्या व्यक्तीला हा प्रश्न विचारणे शोभत नाही. तर दुसरा म्हणाला की, हा पुढचा प्रश्न पाच कोटींसाठी आहे. असे अनेक ट्वीट करत नेटकऱ्यांनी अमिताभ यांना ट्रोल केले आहे.

अमिताभ बच्चन हे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या सोबत ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यानंतर ‘शहर’ आणि ‘झुंड’ या चित्रपटात बिग बी भूमिका साकारणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Amitabh bachchan getting trolled for 10 year old tweet about ladies undergarments dcp 98 avb

ताज्या बातम्या