scorecardresearch

‘फोटो काढून टाका नाहीतर…’, प्रजासत्ताक दिनानिमित्त पोस्ट केलेल्या फोटोमुळे बिग बी झाले ट्रोल

त्यांच्या फोटोवर विनोदवीर कपिल शर्मा आणि श्वेता बच्चनने देखील कमेंट केली आहे.

अमिताभ बच्चन, amitabh bachchan tricolour beard, amitabh bachchan republic day wish, amitabh bachchan instagram, amitabh bachchan beard republic day,

आज संपूर्ण देशभरात ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. भारताचं स्वातंत्र्याचं ७५ वं वर्ष असल्याने हा प्रजासत्ताक दिन विशेष आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील प्रजासत्ताक दिन आठवडाभर म्हणजेच २३ जानेवारी ते ३० जानेवारीपर्यंत साजरा केला जाणार आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या फोटोमुळे त्यांना ट्रोल केले जात आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी झेंड्याच्या रंगांप्रमाणे दाढी आणि मिशी रंगवल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी ‘प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा’ असे कॅप्शन दिले आहे. सध्या सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांचा हा फोटो व्हायरल झाला आहे.

अमिताभ यांना या फोटोमुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. एका यूजरने ‘तुमच्याकडून ही अपेक्षा नाही’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘तुम्ही हा फोटो काढून टाका नाही तर दुसरा फोटो शेअर करत शुभेच्छा द्या’ असे म्हणत सुनावले आहे.

बिग बींच्या या फोटोवर विनोदवीर कपिल शर्माने देखील कमेंट केली आहे. त्याने कमेंटमध्ये ‘हाहाहाहा’ असे म्हटले आहे. तर अमिताभ यांची मुलगी श्वेता बच्चन हिने देखील कमेंट केली आहे. तिने देखील हसण्याचे इमोजी वापरले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amitabh bachchan shared his photo with a tricolour beard on the occasion of republic day avb