बॉलिवूडचे दिग्गज कलाकार अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री दीपिका पदूकोण पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. या दोघांनी ‘पीकू’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यातील यांची बाप आणि मुलीची जोडी ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. अमिताभ आणि दीपिका ‘द इंटर्न’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट ‘द इंटर्न’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात आधी दिवंगत अभिनेते ऋषी कपूर ही भूमिका साकारणार होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर आता ही भूमिका अमिताभ बच्चन साकारणार आहेत.

दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये अमिताभ आणि दीपिका दिसत आहेत. “माझे सर्वात खास सहकलाकार अमिताभ बच्चन यांच्यासोबत पुन्हा एकदा काम करायला मिळणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. ‘द इंटर्न’च्या बॉलिवूड रिमेकमध्ये तुमचं स्वागत आहे”, अशा आशयाचे कॅप्शन दीपिकाने ते पोस्टर शेर करत दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘द इंटर्न’ या चित्रपटाचे दिग्दर्शन नॅंसी मेयर्सने केले आहे. हा हॉलिवबड चित्रपट २०१५मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ऐनी हॅथवे आणि रॉबर्ट डी नीरो मुख्य भूमिकेत होते. आता या चित्रपटाचा हिंदी रिमेक २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे.