scorecardresearch

“मी दीड वर्षापूर्वी कॅन्सरवर उपचार सुरु केले असते तर….”; महेश मांजरेकरांनी व्यक्त केली खंत

नुकतंच त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कर्करोगादरम्यानच्या सर्व गोष्टींबद्दलची खंत बोलून दाखवली.

“मी दीड वर्षापूर्वी कॅन्सरवर उपचार सुरु केले असते तर….”; महेश मांजरेकरांनी व्यक्त केली खंत

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले. एकीकडे चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असताना दुसरीकडे महेश मांजरेकर हे कर्करोगाशी झुंज देत होते. आता महेश मांजरेकर कॅन्सरमुक्त झाले आहे. सध्या त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत आहे. मात्र महेश मांजरेकर यांनी सुरुवातीला जो आजार किरकोळ असल्याचे समजले होते, तो प्रत्यक्ष इतका जीवघेणा ठरु शकतो, याचा त्यांनी कधी विचारही केला नव्हता. नुकतंच त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कर्करोगादरम्यानच्या सर्व गोष्टींबद्दलची खंत बोलून दाखवली.

महेश मांजरेकर यांना काही महिन्यांपूर्वी कॅन्सर झाल्याचे समजले. त्यावेळी ते ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ या चित्रपटाचे शूटिंग करत होते. नुकतंच महेश मांजरेकरांनी हिंदूस्तान टाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्यांना कर्करोगाचे निदान, उपचार आणि चित्रपटाबद्दलचे काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी कर्करोगाबद्दल सांगताना ते म्हणाले, ‘मी जर दीड वर्षापूर्वी कर्करोगाचा उपचार सुरू केला असता तर मला माझं मूत्राशय वाचवता आले असते,’ अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

“माझे मूत्राशय ओव्हरअॅक्टिव्ह पद्धतीने काम करत होते. मी गेल्या दीड वर्षांपासून यावर उपचार घेत होतो. पण एकदा ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’चे शूटिंग सुरु असताना अचानक रक्तस्त्राव सुरु झाला. यामुळे मी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करुन घेतली. त्यावेळी मला मूत्राशयाचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच माझे मूत्राशय ओव्हरएक्टिव्ह पद्धतीने काम करण्यामागचेही कारण कर्करोगचं होते. याचाच अर्थ मी गेल्या दीड वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होतो. त्यामुळे जर मी दीड वर्षापूर्वी कर्करोगाचा उपचार सुरू केला असता तर मला माझं मूत्राशय वाचवता आले असते,” असे महेश मांजरेकर म्हणाले.

“विशेष म्हणजे अंतिम चित्रपटाच्या शूटींगदरम्यान तीन महिने माझी केमोथेरपी सुरु होती. केमोथेरपी सुरु असतानाच ते चित्रपटाची शूटींग करत होते. त्यावेळी मला अभिनेता सलमान खानने परदेशात जाऊन यावर उपचार करण्याचा सल्ला दिला. मात्र मला आपल्या देशातील डॉक्टरांवर विश्वास होता. याच विश्वासाच्या जोरावर मी भारतातच उपचार केले. केमोथेरपी झाल्यानंतर मला त्याचा फारसा परिणाम झाला नाही. शस्त्रक्रियेनंतर पूर्णपणे बरे होण्यासाठी मला 3 महिने लागले,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महेश मांजरेकरांना तुम्ही कॅन्सर झाल्याचे का लपवले? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, “मी सर्वांना माझ्या कॅन्सरबद्दल कोणाला काहीही सांगू नका, अशी सूचना दिली होती. हल्ली अनेकांना कॅन्सर होतो. यामुळे मला ती फार मोठी गोष्ट वाटली नाही. तसेच मी जर याबद्दल सांगितले असते, तर मी सर्वांची दया मागत आहे, असे लोकांना वाटले असते.”

“महेश मांजरेकर यांनीही आपल्या कॅन्सरबद्दल कोणालाही काहीही सांगू नये, अशा सूचना आपण सर्वांना दिल्याचे सांगितले. ते म्हणाले की, अनेक लोक कॅन्सरला बळी पडतात, त्यामुळे ही फार मोठी गोष्ट नव्हती. महेशला वाटले की जर त्याने त्याच्या कॅन्सरबद्दल सांगितले असते तर लोकांना वाटले असते की तो सर्वांची दया मागत आहे.”

“केमोथेरपी सुरु असताना देखील अंतिमचे चित्रीकरण केले पूर्ण”, महेश मांजरेकरांनी केला खुलासा

दरम्यान अंतिमचा ट्रेलर लॉन्चवेळी महेश मांजरेकर यांनी हजेरी लावली होती. यावेळी महेश यांना स्लिम आणि फिट पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले. यावेळी महेश यांनी त्यांची कर्करोगाशी झुंज आणि वेट लॉसची कहानी सांगितली. यादरम्यान त्यांचे जवळपास ३५ किलो वजन कमी झाल्याचे त्यांनी सांगितले होते.

सलमान खानच्या ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटात अभिनेता आयुष शर्मा देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. आयुषचा एक वेगळा लूक या चित्रपटात पाहायला मिळत आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ चित्रपटामध्ये सलमान खान पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. तर आयुष गँगस्टरची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण गेल्यावर्षी १६ नोव्हेंबरपासून सुरू झाले. त्यावेळी फक्त आयुष शुटिंग करत होता. या चित्रपटातून महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा चित्रपट मराठी हिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या