अनुपम खेर यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या कमाईत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत आहे. अनुपम यांनी त्यांच्या ‘मेकअप आर्टिस्ट’च्या मुलीच्या लग्नात हजेरी लावली होती. त्याचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत. त्यानंतर अनुपम यांच्यावर सोशल मीडियावर कौतुकांचा वर्षाव होतं आहे.

अनुपम खेर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ आणि काही फोटो शेअर केले आहेत. हा व्हिडीओ शेअर करत अनुपम म्हणाले, “२७ वर्षांपासून जो माझा मेकअप आर्टिस्ट मंगेश देसाई आहे. आज त्यांच्या मुलीचं म्हणजेच मैथिलीचं सत्येंद्रसोबत लग्न झालं. द काश्मिर फाइल्ससोबतचं मी आता पर्यंत साकारलेल्या बऱ्याच भूमिकांसाठी त्याने माझा मेकएप केला. तर या नव्या दाम्पत्याला देवाचा आशीर्वाद मिळो, प्रेम आणि आशीर्वाद”, असे कॅप्शन अनुपम यांनी दिली आहे.

आणखी वाचा : काश्मिरी पंडित व्यक्तीने बाळासाहेबांविषयी काय सांगितलं?; चिन्मय मांडलेकरने सांगितला ‘तो’ अनुभव

आणखी वाचा : Oscar 2022 : “माझ्या पत्नीचे नाव …”, भडकलेल्या विल स्मिथने स्टेजवर जाऊन सुत्रसंचालकाच्या लगावली कानशिलात

अनुपम खेर यांच्या या साधेपणाने नेटिझन्सची मने जिंकली आहेत. नेटकरी कमेंट सेक्शनमध्ये त्यांची त्यांचे कौतुक करत आहेत. एक नेटकरी म्हणाला, “आम्हाला तुमचा अभिमान आहे.” दुसरा नेटकरी म्हणाला, “सर, तुम्ही ग्लॅमरच्या जगातून आहात असे वाटत नाही. जिथले लोक फायदा आणि तोटा पाहून घरातून पाऊल बाहेर टाकतात तिथे तुम्ही एवढा साधेपणा कुठून आणता. तुमच्या कर्मचार्‍यांना, प्रत्येकाला भेटण्यासाठी आणि त्यांना स्पेशल फीर करून देण्यासाठी नेहमी तयार असता.” तिसरा नेटकरी म्हणाला, “यामुळेच लोक तुमचा खूप आदर करतात.”

आणखी वाचा : या चित्रात तुम्ही सगळ्यात आधी काय पाहिले? यावरून कळेल तुमचे व्यक्तीमत्त्व

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनुपम खेर यांते द कश्मीर फाइल्स या चित्रपटातील भूमिकेसाठी कौतुक केले जात आहे. या चित्रपटाने २२८ कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरित जीवनावर आधारित आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट १९८९ आणि १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या झालेल्या स्थलांतरावर आधारित आहे. हा चित्रपट अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे.