बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अर्जुनची बहीण अंशुला ही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. अंशुला ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच अंशुलाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत घरी आल्यावर सगळ्यात चांगली गोष्ट काय असते हे अंशुलाने सांगितलं आहे.

आणखी वाचा : विमानतळावर दिसले करण जोहरच्या मुलांचे संस्कार, पाहा व्हिडीओ

अंशुलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अंशुला फुलांची प्रिंट असलेला ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे. त्यानंतर ती ड्रेसमधून ब्रा काढताना दिसते. यासोबत अंशुलाने नो ब्रा कल्ब जॉईन केला आहे. खरंतर, रविवारी मित्रांसोबत अंशुला फिरायला गेली होती. त्यानंतर घरी परतल्यावर तिने स्वतःचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अंशुला कपूरने कॅप्शनमध्ये म्हटलं की, “रविवारच्या ब्रंचनंतर घरी परतल्यानंतर सर्वात चांगलं असं वाटतं.” अंशुलाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे.

आणखी वाचा : “कारशेड आरेतच होणार…”, सुमीत राघवनचा राज्य सरकारच्या निर्णयाला पाठिंबा

आणखी वाचा : “टरबूज हे आरोग्यासाठी चांगले… पण शिंदे”; ‘बिग बॉस’ फेम पराग कान्हरेच्या ‘या’ पोस्टपेक्षा नेटकऱ्यांच्या कमेंट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंशुलाच्या या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी हे खरं असल्याचं म्हटलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी अंशुलाची तुलना अर्जुनची गर्लफ्रेंड मलायका अरोरासोबत केली आहे. अंशुला देखील मलायकासारखी हळूहळू बोल्ड होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अंशुला आणि मलायका या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. तर प्रियांका चोप्राने कमेंट करत ‘हे रोजचं आहे,’ असे कॅप्शन दिले आहे.