अॅस्ट्रो मेंबर मूनबिनचे वयाच्या २५ व्या वर्षी निधन झाले आहे. दक्षिण कोरियाच्या अनेक आउटलेट्सने मूनबिनच्या निधनाची माहिती दिली आहे. कोरियाबूच्या एका अहवालानुसार, के-पॉप आयडल सियोलमधील गंगनम-गु येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आला. मूनबिनने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

हेही वाचा – Video: आकांक्षा दुबेचा आत्महत्येपूर्वीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल; रडत म्हणाली, “मला काहीही झाल्यास…”

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना वाटतंय की मूनबिनने आत्महत्या केली आहे आणि त्याच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी त्याचे शवविच्छेदन केले जाईल. मूनबिन १९ एप्रिल रोजी रात्री ८.१० च्या सुमारास त्याच्या घरात मृतावस्थेत आढळून आला. मॅनेजरने तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पण त्याची एजन्सी फॅन्टेजिओने त्याच्या मृत्यूबद्दल अद्याप कोणती माहिती प्रसिद्ध केलेली नाही. पण, निधनाचे वृत्त येताच त्याचे चाहते सोशल मीडियावर त्याला श्रद्धांजली वाहत आहेत.

मूनबिनने अॅस्ट्रो युनिट ग्रुपसोबत पुनरागमन केले आणि तो एक फॅन कॉन टूर होस्ट करणार होता. पण आयोजकांनी आता एक निवेदन जारी करत हा इव्हेंट रद्द करण्यात आल्याची माहिती दिली आहे. “अत्यंत जड अंतःकरणाने आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की २०२३ मूनबोन आणि सान्हा फॅन कॉन टूर: जकार्ता येथे १३ मे रोजी होणारा इव्हेंट रद्द करण्यात आला आहे. बरीच चर्चा आणि विचार केल्यानंतर आमच्या नियंत्रणाबाहेरच्या अनपेक्षित परिस्थितीमुळे आम्हाला हा कार्यक्रम रद्द करावा लागत आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मूनबिनच्या मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण, त्याच्या अचानक निधनाने चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. मोठ्या प्रमाणात त्याचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.