‘बिग बॉस मराठी ३’च्या घरात शिव ठाकरे आणि नेहाची हजेरी, जयला दिलं खास टास्क

बिग बॉस मराठीच्या घरात शिव आणि नेहाचं स्पर्धकांनी स्वागत केलं. यावेळी नेहाने जयला एक खास टास्क देत पेचात पाडलं आहे.

NEHA-SHIV-
(Photo-PR)

‘बिग बॉस मराठी ३ ‘ शो दिवसेंदिवस रंगतदार होत चालला आहे. शनिवारी झालेल्या ‘बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकर यांनी स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. त्यानंतर रविवारच्या भागात या शोमध्ये खास पाहुणे हजेरी लावणार आहेत. ‘बिग बॉस मराठी २’ चा विजेता शिव ठाकरे आणि स्पर्धक नेहा शितोळे या भागात पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहेत. या खास भागात ते स्पर्धाकांसोबत धमाल करत विविध गेम खेळणार आहेत.

नव्या एपिसोडचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून बिग बॉस मराठीच्या घरात शिव आणि नेहाचं स्पर्धकांनी स्वागत केलं. यावेळी नेहाने जयला एक खास टास्क देत पेचात पाडलं आहे. नेहाने जयसोबत गायत्री आणि स्नेहा वाघला उभं केलं. यावेळी त्यांनी जयला एकीला लाल गुलाब तर एकीला काळं गुलाबाचं फूल द्यायला सांगितलं आहे. आता या टाक्समध्ये जय नेमकं कुणाला लाला गुलाब देणार आणि कुणाला काळं हे पाहणं आता औत्सुक्याचं असणार आहे.

“बायो बबल लाइफमधील प्रेम”; अनुष्का शर्माने शेअर केले विराटचे खास फोटो

…आणि जिममध्येच ह्रतिक रोशन गरबा खेळू लागला, व्हिडीओ व्हायरल

याशिवाय ‘बिग बॉस मराठी ३’च्या घरातून एक स्पर्धक घराबाहेर पडणार आहे. त्यामुळे घरातील वातारण तणावग्रस्त दिसू शकतं. दरम्यान बिग बॉसच्या घरात जय आणि स्नेहामध्ये मैत्रीचं नातं तयार झालंय. तर त्यांच्या मैत्रीवर घरातील स्पर्धकांनी अनेक तर्क वितर्क लढवण्यास सुरुवात केलीय. त्यामुळे येत्या काळात दोघांचं नातं कोणतं वळण घेते हे पाहणं देखील उत्सुकतेचं असेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Big boss marathi 3 shiv thakrey and neha as guest give task to jay kpw

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या