‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाला २ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. यंदाच्या पर्वाची थीम ‘ऑल इज वेल’ असली तरी पहिल्याच दिवसांपासून स्पर्धकांमध्ये राडे सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीने पहिल्याच दिवशी घरातून चार सदस्य बाहेर जाणार असल्याची घोषणा केली आणि सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर आता याच मुद्द्यावरुन
अपूर्वा आणि प्रसादमध्ये कडाक्याचे भांडण होताना पाहायला मिळत आहे.

बिग बॉस मराठीचे चौथे पर्व हे आधीच्या पर्वांपेक्षा फार हिट ठरताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात आल्यापासून पहिल्याच दिवशी चार सदस्य बाहेर जाणार असल्याची घोषणा केली. ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री करताना स्पर्धकांना लाल, पिवळा, निळा आणि जांभळा अशा चार रंगाचे बॅण्ड देऊन गट पाडण्यात आले. या सदस्यांनी आपल्या गटातील एका सदस्याला बहुमताने ‘बिग बॉस’च्या घरातील निरुपयोगी सदस्य म्हणून घोषित करायचे आहे. या टास्कदरम्यान अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादे यांच्यात मोठा वाद झाला.
आणखी वााचा : Bigg Boss Marathi 4 : ‘शेवंता’, किरण माने अन् ‘मिसेस मुख्यमंत्री’…, ‘बिग बॉस’च्या घरात सहभागी होणाऱ्या कलाकारांची संपूर्ण यादी

यावेळी अपूर्वाने प्रसादचं नाव घेत तिचं मत मांडलं. त्यानंतर प्रसाद आणि अपूर्वा यांच्या मतभेद झाल्याचे पाहायला मिळाले. “हा कुस्तीचा खेळ नव्हे. आणि तुला असं का वाटतं की तू (योगेश जाधव) त्याच्यापेक्षा उत्तम आहेस?”, असं अपूर्वा म्हणाली. त्यावर उत्तर देत प्रसाद म्हणाला, “हा कुस्तीचा खेळ नाहीये. यावरुन अपूर्वा प्रचंड भडकली आणि प्रसादला थांबवत म्हणाली, “तू मला बोलू देणार आहेस का? की स्वतः एकटाच बोलणार आहेस?” आणि हा वाद वाढतच गेला. प्रसाद म्हणाला, “तू बोलीस त्यावर मी उत्तर दिलं, तुला मी फक्त फास्ट ऐकलं बाकी काही नाही”. त्यावर शब्दाला शब्द वाढत गेला.

आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4 Grand Premiere : ‘बिग बॉस’ मराठीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांची नावे समोर, वाचा संपूर्ण यादी

त्यावर अपूर्वा म्हणाली, “तू बोल मी तुझा आदर करते, आता शांतपणे मी काय बोलते ते पण ऐक…हा कुस्तीचा खेळ नसल्याने त्याच्या बॉडीवर त्याला जज करणं मला अत्यंत चुकीचं वाटतं, तो स्ट्रॉंग आहे आणि म्हणूनच मला तुझ्यासारख्या उद्धट माणसापेक्षा त्या स्ट्रॉंग स्पर्धकासोबत खेळायला जास्त आवडेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रसादला अपूर्वाचे हे म्हणणे पटले नाही. त्यावर तो म्हणाला “उद्धट वैगरे अजिबात बोलू नकॊस”… त्यावर अपूर्वा म्हणाली, बोटं खाली करुन बोल माझ्याशी, मला बिग बॉस यांनी माझं मत विचारलं मी तुझ्याविरोधात मत दिले. तू माझ्याशी हे सर्व बोलू नकोस. तू माझी आई आहेस का? मला असं बोलायच नाही, असे प्रसादने म्हटलं. दरम्यान आज बिग बॉसमध्ये पहिले नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे.