Bollywood Films Releasing In November 2025 : ऑक्टोबर महिन्यात अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. आता नोव्हेंबर महिन्यात बॉलीवूडचे अनेक बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. बॉलीवूडसाठी नोव्हेंबर २०२५ हा एक खास महिना असणार आहे.
प्रेक्षक नव्या सिनेमांची आतुरतेने वाट पाहतात. या महिन्यात अॅक्शन, थ्रिलर, हॉरर, कॉमेडी आणि ड्रामा यांसारख्या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. या महिन्यात कोणते सिनेमे कधी प्रदर्शित होणार आहेत, ते जाणून घेऊया.
इक्कीस
अगस्त्य नंदाची प्रमुख भूमिका असलेला ‘इक्कीस’ हा चित्रपट ७ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून अमिताभ बच्चन यांचा नातू बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. धर्मेंद्र आणि जयदीप अहलावतदेखील महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत.
हक
यामी गौतम आणि इमरान हाश्मी यांचा ‘हक’ हा चित्रपट ७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. लोकप्रिय शाह बानो प्रकरणावर आधारित हा चित्रपट सुपरन एस. वर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे.
जटाधरा
सोनाक्षी सिन्हाच्या ‘जटाधरा’ या चित्रपटात सुधीर बाबू आणि शिल्पा शिरोडकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अभिषेक जैस्वाल आणि व्यंकट कल्याण दिग्दर्शित हा चित्रपट ७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
दे दे प्यार दे २
‘दे दे प्यार दे २’ हा या वर्षातील बहुप्रतीक्षित कॉमेडी चित्रपटांपैकी एक आहे. अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंग अभिनीत हा चित्रपट १४ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘दे दे प्यार दे २’मध्ये आर. माधवन, मीजान जाफरी व इशिता दत्तादेखील आहेत.
मस्ती ४
‘मस्ती ४’मध्ये पुन्हा एकदा विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख व आफताब शिवदासानी हे तिघे एकत्र येणार आहेत. हा कॉमेडी चित्रपट २१ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हॉन्टेड – घोस्ट्स ऑफ द पास्ट ३डी
‘हॉन्टेड – घोस्ट्स ऑफ द पास्ट ३डी’ मध्ये मिमोह चक्रवर्ती आणि चेतना पांडे मुख्य भूमिकांत आहेत. विक्रम भट्ट यांचा हा हॉरर चित्रपट २१ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.