scorecardresearch

Premium

Video कुरळे केस, डोळ्यांना चष्मा अन्… मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा नवीन लूक व्हायरल, नेटकरी म्हणाले…

आमिर खानचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा लूक बघून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

amir khan new look
आमिर खानचा नवा लूक व्हायरल

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात शेवटचा दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. यानंतर आमिरने अभिनयातून ब्रेक घेतला होता. एका मुलाखतीत आमिरने अभिनयातून ब्रेक घेण्यामागचं कारण सांगितलं होतं. आता नुकताच आमिरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतील अभिनेत्याचा नवा लूक बघून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे.

हेही वाचा- तब्बल ९ वर्षांनी अरिजित सिंह व सलमान खानमध्ये पॅच-अप? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

pet dog helped the owner to plant a tree Emotional Video
अरे देवा! मदत करायला गेला अन् मालकाचं काम वाढवून आला; VIDEO चा शेवट पाहून पोट धरून हसाल
foreigner guy making kanda poha viral video
Video : वाह! फॉरेनर दाखवतोय महाराष्ट्रीयन ‘कांदे-पोहे’ रेसिपी! “आम्हाला मुलगा पसंत आहे!” म्हणाले नेटकरी
Zomato agent Riding wheelchair modelled like a motorbike
जिद्द असावी तर अशी! व्हिलचेअर बाईकवरून डिलिव्हरी करतोय हा दिव्यांग व्यक्ती; झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचा फोटो व्हायरल
a young boy dance on lavani with a young girl
तरुणीसह लावणीवर थिरकला तरुण! सादर केली अप्रतिम लावणी, व्हिडीओ होतोय व्हायरल

नुकतच आमिर अविनाश गोवारीकर यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाला होता. यावेळी अभिनेत्याच्या नव्या लूकने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. यावेळी आमिरने हिरव्या आणि पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता. या कुर्त्याबरोबर त्याने निळ्या रंगाची पॅन्ट घातली होती. यावेळी आमिर खानच्या हेअरस्टाईलने सगळ्यांच लक्ष वेधलं. आमिरने यावेळेस थोडे रंगीत आणि कुरळे केसांची हेअरस्टाईल केली होती. आमिरची ही हेअरस्टाईल त्याच्या मंगल पांडे: द राइजिंग चित्रपटातील भूमिकेशी मिळतीजुळती असल्याचे दिसून आले.

आमिरचा हा नव्या लूकचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. नव्या चित्रपटातील हा आमिरचा लूक असल्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. तर काहींनी या लूकवरुन अभिनेत्याला ट्रोल केलं आहे.

हेही वाचा- करिअरमध्ये तब्बल १८० फ्लॉप चित्रपट देऊनही ‘हा’ अभिनेता कसा बनला स्टार? एका वर्षी केलेले सलग ३३ फ्लॉप सिनेमे

आमिरने नुकताच त्याच्या नव्या प्रोजक्टची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत आमिरने आपल्या नव्या चित्रपटाबद्दल सांगितलं आहे. या चित्रपटात आमिर कोणतीही भूमिका साकारणार नसून या चित्रपटाची तो निर्मिती करणार आहे. लाहोर १९४७ असे आमिरच्या नव्या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिका साकारणार आहे. तर राजकुमार संतोषी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तसेच आमिर प्रसिद्ध वकील उज्जवल निकम यांच्या बायोपिकमध्ये काम करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aamir khan spotted in mumbai with new look video viral dpj

First published on: 05-10-2023 at 16:20 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×