Truth of Abhishek Bachchan Reaction on Divorce rumors with Aishwarya Rai: अभिनेता अभिषेक बच्चन व त्याची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्या वैवाहिक जीवनात वादळ आलंय, अशा चर्चा मागच्या बऱ्याच काळापासून होत आहेत. अनंत अंबानीच्या लग्नात अभिषेक आई-वडील, बहीण व भाच्यांबरोबर आला होता, तर ऐश्वर्या मुलीबरोबर आली होती, तेव्हापासून या दोघांच्या नात्याबद्दल खूपच चर्चा होत आहे. त्यांनी ग्रे डिव्होर्स घेतला आहे, असंही म्हटलं जात आहे. आतापर्यंत ऐश्वर्या, अभिषेक किंवा बच्चन कुटुंबाने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दोन-तीन दिवसांपूर्वी अभिषेकचा एक डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. एआयच्या मदतीने बनवलेल्या या व्हिडीओत अभिषेक घटस्फोटावर शिक्कामोर्तब करताना दिसतो. त्यानंतर त्याचा पुन्हा एक व्हिडीओ समोर आला, ज्यामध्ये तो घटस्फोटाचे वृत्त फेटाळताना दिसतोय. पण आता या व्हिडीओमागचं सत्यही समोर आलं आहे.

Abhishek Bachchan reacts on divorce rumors with Aishwarya Rai
ऐश्वर्या रायपासून घटस्फोट घेण्याच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन; म्हणाला…
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
When Jaya Bachchan said Aishwarya Rai is not my daughter
“ती माझी मुलगी नाही,” ऐश्वर्या रायबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर जया बच्चन यांनी केलेलं वक्तव्य; म्हणालेल्या, “मी तिच्याशी…”
Amitabh Bachchan
“गेल्या काही दिवसांपासून…”, अभिषेक बच्चन-ऐश्वर्या रायच्या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान अमिताभ बच्चन यांचे विधान चर्चेत
pandharinath kamble daughter grishma supports father and shared angry post on jahnavi killekar
बाबाच्या अपमानानंतर पंढरीनाथ कांबळेच्या लेकीची जान्हवीसाठी पोस्ट; म्हणाली, “त्यांच्या करिअरवर बोलण्याआधी…”
surekha kudachi praises riteish Deshmukh
“रितेश भाऊ…”, जान्हवीला जेलमध्ये टाकल्यावर सुरेखा कुडची यांची पोस्ट; म्हणाल्या, “अरबाज – निक्की आणि ती…”
Suraj Chavan
“जर सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली तर मी पुढचा सीझन बघणार नाही”, असं का म्हणाली अभिनेत्री?
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक

“मी धूममध्ये किसिंग सीन केला तेव्हा…”, ऐश्वर्या रायने हृतिक रोशनबरोबरच्या सीनवर दिलेली ‘अशी’ प्रतिक्रिया

डीपफेक व्हिडीओमध्ये नेमकं काय?

Abhishek Bachchan Divorce confession video: इन्स्टाग्रामवर फॅन अकाउंटवर पोस्ट केलेल्या बनावट व्हिडीओत अभिषेक “या जुलैमध्ये मी आणि ऐश्वर्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे,” असं म्हणताना दिसतो. पण नंतर मात्र अनेक युजर्सनी या व्हिडीओची पडताळणी केली आणि तो खोटा असल्याचं निष्पन्न झालं.

तृप्ती डिमरीचा सुपरफ्लॉप चित्रपट सहा वर्षांनी पुन्हा प्रदर्शित, दोन दिवसांत कमावले…

प्रतिक्रियेच्या व्हिडीओमध्ये अभिषेक बच्चन काय म्हणतोय?

Abhishek Bachchan Reaction on Divorce: अभिषेक त्याच्या लग्नाची अंगठी दाखवत म्हणाला, “मी अजूनही विवाहित आहे. या अफवांबद्दल माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासारखं काहीही नाही. या सर्व गोष्टी प्रमाणाबाहेर अतिशयोक्ती करून सांगितल्या जात आहेत, हे खूप वाईट आहे. तुम्ही हे का करता हे मला कळतंय. तुम्हालाही काही बातम्या कराव्या लागतात. ठिक आहे. आम्ही सेलिब्रिटी आहोत, त्यामुळे आम्हाला या गोष्टीला सामोरं जावं लागणार.” या व्हिडीओबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चन-ऐश्वर्या रायचा ‘तो’ व्हिडीओ आला समोर, लेक आराध्याचीही दिसली झलक

अभिषेक बच्चनची प्रतिक्रिया केव्हाची?

अभिषेकने डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाल्यावर हे विधान केलंय असं म्हटलं गेलं. पण सत्य मात्र वेगळंच आहे. अभिषेक बच्चनने हे वक्तव्य केलं होतं पण ते आता नाही तर काही वर्षांपूर्वी केलं होतं. अभिषेक बच्चनने २०१६ मध्ये ऐश्वर्या रायच्या ‘सरबजीत’ चित्रपटाच्या प्रिमिअरवेळी हे विधान केलं होतं. त्यावेळी त्याला त्याच्या व ऐश्वर्याच्या नात्यात सगळं आलबेल नसण्याच्या चर्चांबद्दल विचारण्यात आलं होतं. तेव्हा अभिषेक बच्चनने हातातील अंगठी दाखवत ही प्रतिक्रिया दिली होती.

Truth of Abhishek Bachchan Reaction on Divorce rumors
अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन (फोटो – इन्स्टाग्रामवरून साभार)

सोभिताने साखरपुड्याचे फोटो शेअर करताच समांथाच्या चाहत्यांनी केलं ट्रोल; नागा चैतन्यला म्हणाले, “इतक्या लवकर आयुष्यात…”

यापूर्वीही घटस्फोटाच्या अनेकदा चर्चा

घटस्फोटाच्या अफवांमुळे हे जोडपं चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. नुकत्याच झालेल्या अनंत अंबानीच्या लग्नात अभिषेक ऐश्वर्या वेगळे आले होते, त्यानंतर अभिषेकने घटस्फोटाविषयीची एक इन्स्टाग्राम पोस्ट लाईक केली होती, तेव्हापासून यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाल्या. पण लग्नातील एक इनसाइड फोटोत हे दोघेही लेक आराध्याबरोबर एकत्र बसलेले दिसत होते. यानंतर ऐश्वर्या व आराध्या दोघीच न्यूयॉर्कला फिरायला गेल्या होत्या.