विकी कौशल आणि कतरिना कैफ हे बॉलीवूडमधील चर्चेत जोडींपैकी एक आहेत. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०२१ मध्ये दोघांनी राजस्थानमध्ये मोठ्या धूमधडाक्यात लग्न केले. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान नुकत्याच एका मुलाखतीत विकीने कतरिनाबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

हेही वाचा- विजय वर्माने सांगितला करीनासोबत रोमँटिक सीन करण्याचा अनुभव; ‘त्या’ दृश्याचा उल्लेख करत म्हणाला, “मला घाम…”

टाईम्स नाऊला दिलेल्या एका मुलाखतीत, विकी कौशलने त्याच्या फॅशनबाबत मोठा खुलासा केला विकी म्हणाला, “कतरिना अनेकदा मला कपड्यावरुन प्रश्न विचारते, तू काय परिधान केले आहेस? आणि तू हे का घातलं आहेस? मी स्वत:ला फॅशनच्या बाबतीत मिनिमलिस्ट समजतो आणि मला माझ्या वॉर्डरोबमध्ये मर्यादित कपडे ठेवायला आवडतात ज्यात चार शर्ट, चार टी-शर्ट आणि चार जोड्या डेनिम असतात. अखेर कंटाळून कतरिनाने मला कपड्यांबाबत बोलण बंद केलं आहे.”

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी २०२१ साली लग्नगाठ बांधली. राजस्थानातील सवाई माधोपूर जिल्ह्यातील एका भव्य किल्ल्यात दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला. लग्नात कतरिना आणि विकीचे फक्त जवळचे मित्र आणि कुटुंब सहभागी झाले होते. त्याच्या शाही लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवून दिली होती.

हेही वाचा- परिणीती चोप्राच्या सासरच्या कुटुंबात नेमकं कोण कोण? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोघांच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर काही महिन्यांपूर्वी विकीचा जरा हटके जरा बचके चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात विकीबरोबर सारा अली खान मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता विकी लवकरच बहुचर्चित सॅम बहादूर चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. तर, कतरिना कैफ सलमान खान आणि इमरान हाश्मी यांच्याबरोबर ‘टायगर ३’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसेल.