शाहरुख खानच्या ‘पठाण’ची सर्वत्र चर्चा आहे, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट इतिहास रचतो आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत ६०० कोटीहून अधिक कमाई केली आहे. असाच शाहरुखच्या ‘चक दे इंडिया’ या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर कल्ला केला होता. हा चित्रपट आजही कित्येकांचा अगदी फेवरेट आहे. या चित्रपटातील हॉकी खेळणाऱ्या महिला हॉकीपटू यांचीसुद्धा जबरदस्त चर्चा झाली.

आजही या अभिनेत्रींची खरी नावं कोणाच्याच लक्षात नाहीत, पण चित्रपटातील त्यांच्या पात्राच्या नावाने त्यांना ओळखलं जातं. याच चित्रपटात कोमल चौटाला या बिनधास्त हॉकीपटूची भूमिका निभावणारी अभिनेत्री चित्राशी रावत सध्या चर्चेत आहे. चित्रपटात चित्राशीचा जबरदस्त धाकड अंदाज आपण पहिला आणि सगळेच कोमल चौटालाचे चाहते झाले, शिवाय चित्रपटातील कोमल आणि प्रीतीमधील स्पर्धासुद्धा लोकांना पसंत पडली. आता हीच कोमल म्हणजेच चित्राशी लग्नबंधनात अडकणार आहे.

आणखी वाचा : सुपरस्टार मोहनलाल प्रेक्षकांसाठी घेऊन येणार ‘पठाण २’? नेमकं सत्य काय? जाणून घ्या

सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा माहोल बघायला मिळत आहे, काही स्टार्सची लग्न झाली आहेत तर काहींची लवकरच होणार आहेत. अशातच ‘चक दे इंडिया’ फेम अभिनेत्री चित्राशीसुद्धा बोहल्यावर चढणार आहे. ४ फेब्रुवारीला चित्राशी रावत ही अभिनेता ध्रुवादित्य भागवनानी याच्याबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतंच तिने तिच्या मैत्रिणींबरोबरचे बॅचलर पार्टीतील काही फोटोज शेअर केले. या फोटोमध्ये डेलनाज इराणी, मूनमून बॅनर्जी, या टेलिव्हिजन अभिनेत्रीसुद्धा होत्या.

View this post on Instagram

A post shared by Dhruvaditya Bhagwanani (@dhruvaaditya_)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्राशीचे हे फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चित्राशीचा होणारा नवरा ध्रुवादित्य हासुद्धा एक अभिनेता आहे. २०१२ साली एका चित्रपटाच्या सेटवर हे दोघं भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. चित्राशीने नंतर ‘लक’, ‘ब्लॅक होम’, ‘फॅशन’सारख्या चित्रपटात अभिनय केला. सध्या चित्रपटाच्या निमित्ताने नव्हे तर लग्नाच्या निमित्ताने चित्राशी पुन्हा चर्चेत आली आहे.