काजोल ही बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. गेली अनेक वर्षं ती तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना भारावून टाकत आली आहे. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि तिच्या दिलखुलास स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असते. ती नेहमीच तिच्या दोन्ही मुलांबद्दल, पतीबद्दलचं प्रेम सोशल मीडियावरून व्यक्त करत असते. आता तिने केलेली एक पोस्ट खूप चर्चेत आली आहे.

काजोल हल्ली मोजक्याच चित्रपटांमध्ये काम करताना दिसते. पण या तिच्या निर्णयामुळे तिचा चाहतावर्ग अजिबात कमी झालेला नाही. तिच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते आतुर असतात. तर काजोलही सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. आता तिने तिच्यामध्ये आणि तिच्या लेकीमध्ये तिला काय साम्य दिसलं सांगितलं आहे.

आणखी वाचा : Video: “आईला मान खाली घालायला लावली…” चारचौघात काजोलबरोबर केलेल्या ‘त्या’ वागणूकीमुळे न्यासा देवगणवर नेटकरी नाराज

काजोलने नुकताच AIने (आर्टिफिशियल इंटेलिजन्सने) तिचा बनवलेला फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ती तिची मुलगी निसासारखी दिसते, असं ती म्हणाली. या फोटोमध्ये तिने निसाला टॅग करत लिहिलं, “AI आणि मी… तुम्ही ओळखू शकता का मी कोणासारखी दिसते? या फोटोमध्ये मी ज्या व्यक्तीला टॅग केलं आहे ते या प्रश्नाचं उत्तर आहे.”

हेही वाचा : Video: काजोल आणि तनिषाने मिळून आईला भेट दिला आलिशान बंगला, झलक पाहून व्हाल आवाक्

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता तिची ही पोस्ट खूप व्हायरल होत असून यावर प्रतिक्रिया देत तिचे चाहते तिचा हा फोटो आवडल्याचं आणि तिच्यात आणि निसामध्ये खरोखर साम्य दिसत असल्याचं सांगत आहेत.