बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत कायम चर्चेत असते. बॉलिवूडवर आगपाखड असो किंवा राजकीय भूमिका मांडणं असो कंगना तिचे विचार अगदी स्पष्टपणे मांडत असते. सध्या ट्विटरची मालकी एलॉन मस्क यांच्याकडे असल्याने कंगनाचं ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरू होणार का अशी चर्चा होत आहे. नुकतंच कंगनाने ‘आज तक’च्या वृत्तवाहिनीच्या ‘पंचायत आजतक’ या कार्यक्रमात हजेरी लावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या मुलाखतीमध्ये कंगना नेहमीप्रमाणे तिच्या खरमरीत शैलीत उत्तरं दिली. ट्विटर, बॉलिवूड, नेपोटीजम, साऊथचे चित्रपट, राजकारण अशा विविध गोष्टींवर कंगनाने भाष्य केलं आहे. इतकंच नाही तर “मी ट्विटरवर परत आली तर खूप खळबळ होईल” असंही कंगना या कार्यक्रमात म्हणाली. मध्यंतरी कंगनाने कन्नड चित्रपट ‘कांतारा’चे तोंडभरून कौतुक केले आणि हिंदी चित्रपटांवर टीकादेखील केली. पण याचवर्षी तिचा ‘धाकड’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला.

आणखी वाचा : अश्रद्धतेकडून सश्रद्धतेचा प्रवास; बहुचर्चित ‘गोदावरी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

आपला चित्रपट फ्लॉप झाल्याबद्दल कंगनाने या मुलाखतीमध्ये स्पष्टीकरण दिले आहे. कंगना म्हणाली, “माझासुद्धा एक चित्रपट यावर्षी बॉक्स ऑफिसवर सणकून आपटला. त्यातून मला एक गोष्ट शिकायला मिळाली की ती म्हणजे या चित्रपटातील माझ्या पात्रावर गरजेपेक्षा जास्त पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव पडला आणि त्यामुळेच ते प्रेक्षकांनी नाकारलं.”

कंगनाने तिच्या चित्रपटातील नेमकी कोणती गोष्ट चुकली ती समोर मांडली आणि त्यामुळे तीचं सोशल मिडियावर चांगलंच कौतुक होताना दिसत आहे. कंगना इंदिरा गांधी यांच्यावर बेतलेल्या चारित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. शिवाय या चित्रपटाचं दिग्दर्शनही तीच करणार आहे. तिचा फर्स्ट लूक लोकांना चांगलाच आवडला आहे आणि तिच्या या चित्रपटासाठी सगळेच उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress kangana ranaut express her thoughts abour her latest film dhaakad failure on box office avn
First published on: 31-10-2022 at 18:26 IST