काही महिन्यांपासून बॉलिवूडमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरच्या अफेअरच्या बातम्या चांगल्याच चर्चेत आहेत. अलीकडेच सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर दिसले होते. दोघे एकत्र पार्टीत पोहोचले होते, तेव्हापासून त्यांची चांगलीच चर्चा होत आहे. त्यानंतर अनन्याने आदित्य रॉय कपूरच्या ‘द नाईट मॅनेजर’ या वेब सीरिजच्या प्रीमियरलाही हजेरी लावली होती.

दीपिका कक्करचं पहिलं लग्न का मोडलं होतं? घटस्फोटानंतर अभिनेत्रीने शोएब इब्राहिमशी धर्म बदलून केलेला विवाह

आदित्य व अनन्या या दोघांनी लॅक्मे फॅशन विकमध्ये एकत्र वॉक केला होता. ते दोघेही फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राचे शो स्टॉपर होते. त्यांनी एकत्र वॉक केला आणि पोज दिल्या. या दोघांचे अनेक फोटो व व्हिडीओ व्हायरल झाले होते. आता अनन्याशी अफेअरच्या चर्चांदरम्यान आदित्यला लग्नाबद्दल प्रश्न विचारलं यावर त्याने उत्तर दिलं आहे.

“एक दिग्दर्शक माझ्यासमोर कपडे काढून…” अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव; म्हणाली “१४ वर्षांच्या…”

बॉलिवूडमध्ये लगीनघाई सुरू आहे, त्यामुळे आदित्यचा लग्न करण्याचा विचार आहे का? तो लग्नबंधनात कधी अडकणार असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, “मला वाटतं की प्रत्येकजण लग्न करत आहे, परंतु माझा सध्या कोणताही विचार नाही. त्यामुळे, मी माझा वेळ घेईन आणि योग्य वेळ येईल तेव्हा लग्नाचा निर्णय घेईन.”

View this post on Instagram

A post shared by Ananya ? (@ananyapanday)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, लवकरच आदित्यचा ‘गुमराह’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट तमिळ चित्रपट ‘थडम’चा रिमेक आहे. हा चित्रपट ७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.