२०२२ मध्ये बॉलिवूड चित्रपटांना फारसे यश मिळाले नाही, प्रेक्षकांनी या चित्रपटांकडे पाठ फिरवली. २०२३ मध्ये मात्र बॉलिवूडचे अनेक चित्रपट येणार आहेत. प्रेक्षकदेखील उत्सुक आहेत. दिग्दर्शक रोहित शेट्टी ‘सर्कस’च्या अपयशानंतर आता सिंघम ३ चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. अजय देवगणने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

अजय देवगण नुकताच ‘दृश्यम २ या चित्रपटात दिसला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. अजय देवगणच्या ‘सिंघम’ चित्रपटाच्या सिक्वेलसाठी चाहते उत्सुक आहेत. अशातच नवीन वर्षात अजय देवगणने ही आनंदाची बातमी दिली आहे. पोस्टमध्ये त्याने रोहित शेट्टीबरोबरचा फोटो शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहले आहे, “रोहित शेट्टी बरोबर ‘सिंघम अगेन’ च्या कथनाने नवीन वर्षाची चांगली सुरुवात केली. मी कथा ऐकली कथा फायर आहे. देवाच्या इच्छेनुसार हा आमचा ११ ब्लॉकबस्टर चित्रपट असेल” अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सिंघम’ चित्रपटाच्या पुढील भागाचं नाव ‘सिंघम अगेन’ असं असणार आहे. २०११ साली ‘सिंघम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होती. त्यानंतर २०१४ साली या चित्रपटाचा दुसरा भाग ‘सिंघम रिटर्न्स’ प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या चित्रपटाचा तिसऱ्या भागातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी रोहित शेट्टी व अजय देवगण सज्ज आहेत. तसेच या चित्रपटात दीपिका पदुकोणदेखील दिसणार आहे