Air India Plane Crash : गुजरातमधील अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताच्या घटनेमध्ये २७४ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. फ्लाइट एआय-१७१ हे ७८७ ड्रीमलाइनर हे विमान अहमदाबादहून लंडन गॅटविकला जात होतं. मात्र, अहमदाबादवरून टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच हे विमान एका निवासी वसतिगृहात कोसळलं आणि मोठी दुर्घटना घडली. त्यानंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात आला आहे.

या भीषण अपघातातून विश्वासकुमार रमेश ही एकमेव व्यक्ती सुखरूपपणे वाचली आहे. या अपघातात त्याचं सुखरूप असणं हा एक चमत्कारच मानला जात आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या व्यक्तीची भेट घेतली. सर्व जण त्याच्या सुखरूप असण्याबद्दल सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत असतानाच एका गायिकेनं विश्वासकुमार रमेशच्या जिवंत राहण्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

लोकप्रिय अभिनेत्री व गायिका सुचित्रा कृष्णमूर्तीनं अहमदाबाद विमान अपघातातून वाचलेला विश्वासकुमार रमेश हा अपघाताच्या वेळी विमानात असल्याचा दावा खोटा असल्याचं ट्विट केलं होतं. विश्वासकुमार रमेश हा विमान अपघातातून वाचलेली एकमेव व्यक्ती आहे. ते खरोखरच विचित्र आहे. त्याच्या कुटुंबानं त्याच्या या वृत्ताला का दुजोरा दिला नाही? जर हे खरं असेल, तर त्याला शिक्षाच नाही तर रुग्णालयातही पाठवलं पाहिजे, असं त्यात म्हटलं आहे.

सुचित्रा कृष्णमूर्तीने डिलीट केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉट

सुचित्राची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी तिच्यावर टीका केली. गायिकेच्या या असंवेदनशील वक्तव्यामुळे तिला नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागले. अनेक नेटकऱ्यांनी सुचित्राला ट्विटबद्दल ‘अहमदाबाद रुग्णालयानंच विश्वास कुमार एअर इंडियाच्या विमानात असल्याचं सत्य सांगितलं आहे आणि हे माध्यमांमध्येही प्रसिद्ध झालं होतं. बोलताना खऱ्या-खोट्याचा विचार करावा, असे म्हणत तिनं खडेबोल सुनावले आहेत.

अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीची एक्स पोस्ट

नेटकऱ्यांचा रोष आणि नंतर सत्य परिस्थिती कळताच सुचित्रानं आधीचं ट्विट डिलीट केलं आणि नवं ट्विट शेअर करीत माफी मागितली आहे. या नवीन ट्विटमध्ये ती असं म्हणते, “एअर इंडियाच्या अपघातातून वाचलेल्या व्यक्तीबद्दलचं माझं आधीचं ट्विट मी डिलीट केलं आहे. त्याच्याबद्दल खोटी माहिती का पसरवली जात आहे ते देवालाच माहिती. माझ्या चुकीच्या ट्विटबद्दल मी माफी मागते”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, याबद्दल सुचित्रानं असंही म्हटलं की, सुचित्रा कृष्णमूर्तीच्या एका मैत्रिणीनं विश्वासकुमार रमेश यांच्याबद्दलची चुकीची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. मैत्रिणीच्या या माहितीची सुचित्रानं कोणतीही शहानिशा न करता चुकीची माहिती पुन्हा पोस्ट केली. त्याबद्दल तिनं दु:खही व्यक्त केलं आहे आणि माफीही मागितली आहे.