Akshay Kumar and Twinkle Khanna’s Photos: सध्या दिवाळी धुमधडाक्यात साजरी केली जात आहे. अगदी सामान्यांपासून ते श्रीमंतापर्यंत सर्व जण हा सण मोठ्या उत्साहात साजरा करीत आहेत. अनेक जण सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर करीत त्यांनी दिवाळी कशी साजरी केली, हे चाहत्यांबरोबर शेअर करीत आहेत.
अभिनेत्री आलिया भट्ट, करीना कपूर खान, करिश्मा कपूर, नीतू कपूर, सोहा खान या सर्वांनी एकत्र दिवाळी साजरी केल्याचे पाहायला मिळाले. आलियाने सोशल मीडियावर फोटोदेखील शेअर केले आहेत. तसेच, इब्राहिम अली खानस जेह व तैमूर यांनीदेखील या दिवाळी पार्टीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. इब्राहिमने त्याच्या भावंडांबरोबर एक छान फोटो शेअर केला होता. त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत त्यांचे कौतुक केले.
ट्विंकल खन्नाने शेअर केली पोस्ट
आता बॉलीवूडच्या खिलाडी कुमारनेदेखील दिवाळी साजरी केली आहे. त्याची पत्नी अभिनेत्री ट्वि्ंकल खन्नाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ट्विंकल खन्ना व अक्षय कुमार दोघेही पारंपरिक कपड्यांमध्ये दिसत आहेत. तसेच, दोघेही हसताना दिसत आहेत. अक्षय कुमारच्या हातात एक कप दिसत आहे. तर ट्विंकल संत्री खात असल्याचे पाहायला मिळत आहे.
हे फोटो शेअर करताना ट्विंकलने ही दिवाळी लंडनमध्ये साजरी करीत असल्याचे सांगितले. अभिनेत्रीने लिहिले, “लंडनमध्ये दिवाळी साजरी करीत आहोत. आम्ही छान कपडे परिधान केले आहे. पण, आमच्याकडे कोणतीही मिठाई नाही. त्यामुळे संत्री हा लाडू असल्याचे मानून आम्ही ते खात आहोत. जेव्हा आम्ही मंदिरात जाऊ, तेव्हा खरी मिठाई घेऊ.”
पुढे सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत अभिनेत्रीने लिहिले, “सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! तुमच्यात आनंद, प्रेम येवो”, असे लिहीत अभिनेत्रीने शुभेच्छा दिल्या. ट्विंकलच्या या पोस्टवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. तर, अनेक चाहत्यांनी कमेंट्स करीत या सेलिब्रिटी जोडप्याला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अक्षय कुमारच्या कामाबद्दल बोलायचे तर २०२५ मध्ये त्याचे ‘केसरी चॅप्टर २’, ‘हाऊसफुल ५’, ‘जॉली एलएलबी ३’, ‘स्काय फोर्स’ हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. लवकरच तो ‘ वेलकम टू द जंगल’ व ‘हेराफेरी ३’मध्ये दिसणार आहे.
ट्विंकल खन्ना सध्या अभिनेत्री काजोलबरोबर ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या शोचे सूत्रसंचालन करीत आहेत. या शोमध्ये बॉलीवूडमधील अनेक लोकप्रिय कलाकार सहभागी होताना दिसतात. त्यांचे आयुष्य, त्यांच्या करिअरबाबत ते मनमनोकळेपणाने बोलतात. अनेक किस्से सांगतात. त्यांच्या मैत्री, अनुभवांबद्दल सांगतात. या शोमध्ये सलमान खान व आमिर खान, अक्षय कुमार व सैफ अली खान, आलिया भट्ट व वरुण धवन या कलाकारांनी हजेरी लावली आहे. आता आगामी काळात कोणते कलाकार या मंचावर दिसणार, ते कोणते किस्से सांगणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.