‘गजनी’ फेम अभिनेत्री असिन थोट्टूमकल हिने बिझनेसमन राहुल शर्माशी लग्न केलंय. राहुल हा अक्षय कुमारचा जवळचा मित्र आहे व त्यानेच असिन अन् राहुलची ओळख करून दिली होती, नंतर या जोडप्याने लग्न केलं. २०१७ मध्ये जेव्हा असिन बाळाला जन्म देणार होती, त्यादिवशी अक्षयने एक विमान स्टँडबायवर ठेवलं होतं, असा खुलासा राहुलने केला आहे. इतकंच नाही तर असिन व राहुल आई-बाबा झाले त्यादिवशी अक्षय दिवसभर राहुलच्या संपर्कात होता.

शिखर धवनच्या ‘धवन करेंगे’ या कार्यक्रमात नुकतीच अक्षय कुमारने हजेरी लावली. या मुलाखतीत त्याने अनेक विषयांवर गप्पा मारल्या. याचदरम्यान शिखरने राहुल शर्माचा एक व्हिडीओ मेसेज शेअर केला. हा मेसेज पाहून अक्षय खूप भावुक झाला. राहुल व्हिडीओमध्ये म्हणाला, “जेव्हा माझ्या मुलीचा जन्म होणार होता, तेव्हा अक्षय मला सतत फोन करत होता आणि म्हणत होता की बाळाचा जन्म झाल्यावर मला सांग. मी म्हणालो, ‘हो, नक्कीच.’ जेव्हा तिचा जन्म झाला, तेव्हा मी सर्वात आधी अक्षयला फोन करून गूड न्यूज दिली होती.”

सानिया मिर्झाने शोएब मलिकशी घटस्फोट घेतल्यावर बदललं दारावरचं नाव; नव्या नेमप्लेटसह शेअर केले खास Photos

राहुलने सांगितलं की त्यांची मुलगी अरीनचा जन्म केरळमधील कोची इथं झाला होता. तिच्या जन्मानंतर काही तासांतच अक्षय तेथे पोहोचला होता. अगदी राहुलच्या कुटुंबियांच्या आधी अक्षय तिथे होता. “बाळाचा जन्म झाल्यावर त्याला भेटता यावं, यासाठी अक्षयने सकाळपासून विमान स्टँडबायवर ठेवलं होतं. माझे कुटुंबीय तिथे येण्याआधी तो तिथे पोहोचला होता. ही एक अशी आठवण आहे जी मी माझ्या आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही,” असं राहुल म्हणाला.

स्वतःच भांडी घासतो, वापरलेले कपडे घालतो अक्षय कुमारचा लेक; १५ व्या वर्षी आरवने सोडलं घर, अभिनेता म्हणाला, “त्याला पैसे…”

अक्षय कुमार माझी सर्वात मोठी ताकद आहे, असं राहुलने म्हटलं. “जेव्हा मला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असतं, तेव्हा तू माझ्या पाठीशी आहेस असा विचार करून मी पुढे जातो. हे बळ मला तुझ्याकडून मिळतंय,” असं राहुल म्हणाला. १०-१५ वर्षांपूर्वी राहुल जेव्हा आयुष्यात गोंधळलेल्या अवस्थेत होता, तेव्हा अक्षयने मला पाठिंबा दिला होता, असं राहुलने नमूद केलं.

“जिच्यासाठी ते भांडले….”, ऐश्वर्या रायसाठी विवेक ओबेरॉय अन् सलमानच्या भांडणावर सलीम खान यांनी दिलेली प्रतिक्रिया

अक्षयनेही राहुलचं कौतुक केलं आणि म्हणाला की तो खूप चांगला आहे आणि अत्यंत सकारात्मक आहे. “तो त्याच्या पत्नीवर, मुलीवर वेड्यासारखा प्रेम करतो. तो तिला देवीप्रमाणे वागवतो. आमची खूप घट्ट मैत्री आहे, कधीकधी आम्ही २-३ आठवडे एकमेकांशी बोलत नाही, पण जेव्हा आम्ही पुन्हा बोलतो तेव्हा आधी जिथे बोलणं थांबवलं होतं, तिथूनच सुरुवात करतो,” असं अक्षय म्हणाला.

परेश रावल यांच्या पत्नीला पाहिलंत का? एकेकाळी ‘मिस इंडिया’ जिंकणाऱ्या स्वरूप आता काय करतात? जाणून घ्या

दरम्यान, असिनने एकदा सांगितलं होतं की ‘हाऊसफुल २’ च्या शूटिंगदरम्यान ती राहुलला भेटली होती. अक्षयने कुमारनेच तिची व राहुलची ओळख करून दिली होती, त्यानंतर ते एकमेकांना डेट करू लागले आणि मग लग्न केलं. असिन व राहुल यांना अरीन नावाची एक मुलगी आहे.