अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ईदच्या मुहूर्तावर १० एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टायगर आणि अक्षयने या चित्रपटाचं प्रमोशन वेगवेगळ्या शहरांत जाऊन अनोख्या पद्धतीने केलंय. सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडीओ शेअर करत या कलाकारांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान, अक्षयने एका मुलाखतीत त्याच्या बालपणाची एक आठवण सांगितली आहे.

रणवीर इलाहाबादियाच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अक्षयने डॉन बॉस्को पब्लिक स्कूल आणि मुंबईतील त्याच्या बालपणाबद्दल सांगितलं. अक्षयने असंही सांगितलं की, तो लवकरच त्याचं पूर्वीचं भाड्याचं घर विकत घेण्याचा विचार करत आहे.

हेही वाचा… बॉक्स ऑफिसच्या अपयशासाठी महिला जबाबदार? क्रिती सेनॉन स्पष्टच म्हणाली, “… दोष मुलींना देतात”

मुलाखतीदरम्यान रणवीरने अक्षयला विचारले की, डॉन बॉस्को शाळेला पुन्हा भेट देताना त्याला कसं वाटतं? यावर अक्षय म्हणाला, “माहीत नाही का, पण मला तिथे जायला खूप आवडतं. माझ्या जुन्या घरी जायला मला आवडतं. जुन्या घरात आम्ही भाड्याने राहायचो. ५०० रुपये घराचं भाडं तेव्हा आम्ही द्यायचो. आता असं ऐकायला आलंय की, ती इमारत तोडून त्याचं नवीन बांधकाम सुरू करणार आहेत. मी तिथे सांगून ठेवलंय की, मला तिसरा मजला खरेदी करायचाय, कारण मी तिथे राहायचो. 2 bhk फ्लॅट तिथे तयार होतं आहे आणि मी आधीच सांगून ठेवलंय की मला तिथे एक फ्लॅट विकत घ्यायचा आहे.”

अक्षय कुमार त्याच्या बालपणीच्या भावूक आठवणी सांगत पुढे म्हणाला, “तिथे माझं कोणीचं नाहीय, पण मला तिथे घर घ्यायचंय. कारण मला आठवतंय, जेव्हा आम्ही तिथे राहायचो, बाबा ९ ते ६ कामाला जायचे. ते घरी यायच्या वेळेस मी आणि माझी बहीण खिडकीत उभे राहून बाबांना येताना पाहायचो. ते एक दृश्य तिथे अजून तसंच आहे. खाली एक पेरूचं झाड होतं, आम्ही त्या झाडावरून पेरू तोडायचो. मी आताही कधी तिथे जातो तर ते झाड मला अजूनही दिसतं, ते तिथेच आहे. मला मनापासून मी जिथून आलोय, जिथे मोठा झालोय, अशा गोष्टींच्या सानिध्यात राहायचंय.”

हेही वाचा… “कृपया आता तरी भांडू नका”, ६ वर्षानंतर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवरचा पुन्हा एकदा विमानाने प्रवास; चाहते म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अक्षय कुमारच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या आगामी चित्रपटात अक्षय टायगर श्रॉफबरोबर झळकणार आहे. मानुषी छिल्लर, अलाया फर्नीचरवाला, पृथ्वीराज सुकुमारन, रोनित रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत.