आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने गेल्यावर्षी एप्रिलमध्ये लग्न केलं. दोघांचे मोजके मित्र आणि जवळच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत रणबीरच्या राहत्या घरी आलिया-रणबीरचा विवाहसोहळा संपन्न झाला होता. आलिया भट्टने लग्नात लेहेंगा न घालता साडी नेसली होती. आलियाचा लग्नातील लूक चांगलाच चर्चेत राहिला होता. याविषयी तिने ‘वोग’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

हेही वाचा : “भर रस्त्यात सगळेच मला…”, हास्यजत्रा फेम निखिल बनेने सांगितला ‘बने’ आडनावाचा किस्सा, म्हणाला…

आलिया भट्टने तिच्या लग्नात सब्यसाचीने डिझाईन केलेली ऑफ व्हाईट रंगाची सुंदर साडी नेसली होती. लग्नात लेहेंग्याऐवजी साडी का नेसली? याबाबत आलिया म्हणाली, “मला साड्या खूप आवडतात. कपड्यांच्या बाबतीत साडी मला जगात सुंदर आणि आरामदायी वाटते आणि आरामदायी कपड्यांना मी नेहमीच प्राधान्य देते. लग्नात मला लेहेंग्यापेक्षा साडी नेसणं जास्त सोयीस्कर वाटलं.”

हेही वाचा : ‘बंटी और बबली’सारखा चित्रपट देणाऱ्या शाद अलीची कोर्टात धाव; स्क्रिप्ट चोरल्याचा दिग्दर्शकाचा आरोप

आलिया पुढे म्हणाली, “प्रत्येक महिलेने आपल्याला योग्य आणि आरामदायी वाटतीय असे कपडे घातले पाहिजे. जेव्हा आयुष्यात असे खास प्रसंग असतात, तेव्हा नेहमी तुम्हाला मनापासून काय आवडेल? अशाच गोष्टीची निवड करा. मग ती साडी असो, ड्रेस असो किंवा दुसरं काही…आणि महिलांसाठी बाजारात अनेक प्रकारचे कपडे उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्याला हवं ते आपण घालू शकतो.”

हेही वाचा : “३६ दिवस, १३ शहरं अन्…”, संकर्षण कऱ्हाडेचा ‘असा’ होता अमेरिका दौरा; म्हणाला, “नाटकाच्या प्रयोगांना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आलिया भट्ट लवकरच ‘जिगरा’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. अभिनेत्रीने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे. याशिवाय आलिया ‘बैजू बावरा’, ‘तख्त’ चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे.