बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी काही महिन्यांपूर्वी ते आई-बाबा होणार असल्याची बातमी दिली. त्या दिवसापासून ते दोघेही खूप चर्चेत आहेत. आलिया भट्टच्या बाळासाठी कपूर कुटुंबियाप्रमाणेच तिचे चाहतेही प्रचंड उत्सुक होते. गेल्या महिन्यात आलियाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. काही दिवसांपूर्वी आलियाच्या प्रसूतीची तारीख समोर आली होती. येत्या नोव्हेंबर महिन्याअखेरपर्यंत ती बाळाला जन्म देऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र त्यापूर्वीच आलिया भट्ट ही रुग्णालयात दाखल झाली आणि काही मिनिटांपूर्वीच तिने गोड बातमी दिली आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आज आई-बाबा झाले आहेत. आलियाने गिरगावातील ‘एच.एन.रिलायन्स’ रुग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आलिया भट्टने दिलेल्या या बातमीने भट्ट आणि कपूर कुटुंबियांबरोबरच तिचे चाहतेही अत्यंत खुश झाले आहेत. अशातच आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत बाळाच्या आगमनाविषयी आनंद व्यक्त केला आहे.

इन्स्टाग्रामवर तिने सिंहाच्या कळपाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पोस्ट करत लिहिले, “आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाची बातमी. आमच्या बाळाचा जन्म झाला आणि ती एक मुलगी आहे. ती खूप मनमोहक आहे. आज अधिकृतरित्या आम्ही भरभरून प्रेम, आशीर्वाद मिळालेले पालक आहोत. खूप खूप प्रेम,आलिया आणि रणबीर.”

आणखी वाचा : आलियाच्या होणाऱ्या बाळासाठी दीपिका उत्सुक; स्टोरी शेअर करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आलिया भट्ट ही २० ते ३० नोव्हेंबर या दिवसांमध्ये बाळाला जन्म देऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्यापूर्वीच तिने बाळाला जन्म दिला आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे लग्न १४ एप्रिल २०२२ रोजी मुंबईत झाले होते. लग्नानंतर दोन महिन्यांनी म्हणजे जून महिन्याच्या अखेरीस त्यांनी चाहत्यांना ही गुडन्यूज दिली होती.