२००१ साली प्रदर्शित झालेला देशाच्या राजकीय उदासीनतेवर भाष्य करणारा अभिनेता अनिल कपूर यांचा ‘नायक’ हा चित्रपट त्याकाळी प्रचंड लोकप्रिय झाला होता. या चित्रपटामध्ये अभिनेता अनिल कपूर व राणी मुखर्जी मुख्य भूमिकेमध्ये झळकले होते. याबरोबरच परेश रावळ, अमरिष पुरी यांच्याही जबरदस्त भूमिका यात पाहायला मिळाल्या. एक दिवसाचा मुख्यमंत्री नेमकं राज्यात कसे बदल घडवून आणतो यावर या चित्रपटाने भाष्य केलं.

शंकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची तेव्हा चांगलीच क्रेझ होती. मध्यंतरी एका मुलाखतीदरम्यान अनिल कपूर यांनीच ‘नायक’चा सिक्वल बनावा अशी इच्छा व्यक्त केली होती. आता पुन्हा खुद्द अनिल कपूर यांनी नायकच्या सीक्वलबद्दल मोठं भाष्य केलं आहे. आपल्या इंस्टाग्राम पोस्टवर एका चाहत्याला उत्तर देताना ‘नायक २’ लवकरच येणार असल्याचं अनिल कपूर यांनी कॉमेंट करत सांगितलं आहे.

आणखी वाचा : सहा वर्षांनी एकत्र आले डॉ. गुलाटी व कपिल शर्मा; अर्चना पूरण सिंग यांची भावुक पोस्ट चर्चेत

नुकतीच अनिल कपूर यांनी बॉबी देओलबरोबरचा फोटो असलेली एक पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली. यामध्ये बॉबी आणि अनिल दोघेही शर्टलेस दिसत आहे. या वयातही अनिल कपूर यांच्या फिटनेसची लोकांनी प्रचंड प्रशंसा केली आहे. याच पोस्टखाली एका चाहत्याने अनिल यांना ‘नायक २’ करायची मागणी केली. त्या चाहत्याला उत्तर देताना अनिल कपूर यांनी लिहिलं, “याचा सीक्वल लवकरच बनणार आहे.”

अनिल कपूर यांच्या या कॉमेंटनंतर सोशल मीडियावर सध्या ‘नायक २’ची चर्चा सुरू आहे. प्रेक्षक या चित्रपटाचा सीक्वल बघण्यास फारच उत्सुक आहेत. या नव्या भागात नेमकं कथानक कसं असेल याची उत्सुकता लोकांना लागून राहिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनिल कपूर नुकतेच रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’मध्ये मुख्य भूमिकेत झळकले. त्यांच्या कामाची लोकांनी प्रशंसा केली आहे. तसेच या चित्रपटात अनिल कपूर यांच्यासह बॉबी देओलनेही जबरदस्त कमबॅक केला आहे. अद्याप ‘नायक २’बद्दल अधिकृत घोषणा झालेली नसली तरी अनिल कपूर यांच्या एका कॉमेंटवर प्रेक्षक याची उत्सुकतेने वाट बघत आहेत.