अभिनेता अजय देवगणचा भोला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा दमदार व थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर भोलाची टीम आता प्रमोशन करताना दिसत आहे. अशातच अजयने ट्विटरवर चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. अजयने ट्विटरवर ‘आस्क भोला’ सेशन ठेवलं होतं. त्यात त्याने काही प्रश्नांची मजेशीर उत्तरं दिली.

‘नाटू नाटू’ला Oscar मिळाल्याची जॅकलिन फर्नांडिसच्या मेकअप आर्टिस्टने उडवली खिल्ली; म्हणाला, “पैसे असतील तर काहीही…”

अजय देवगण व तब्बू चांगले मित्र आहेत. तसेच त्या दोघांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. अलीकडे आलेल्या ‘दृश्यम’, ‘दृश्यम २’, ‘गोलमाल अगेन’, ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं होतं. त्यानंतर आता ते दोघेही ‘भोला’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तब्बू पुन्हा एकदा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

“उत्तम अभिनय येतो म्हणून नखरे…” रोहित शेट्टीने सांगितलेलं मराठी कलाकारांना चित्रपटांत घेण्यामागचं कारण

‘सगळे चित्रपट तब्बूबरोबर का करताय? त्यामागचं काही खास कारण आहे का?’ असा प्रश्न एका चाहत्याने अजयला विचारला. त्यावर अजय म्हणाला, ‘तिच्या तारखा मिळाल्या.’ तबूच्या तारखा मिळाल्याने चित्रपट करत असल्याचं मजेशीर उत्तर अजयने दिलं.

एका यूजरने विचारले की, या वयात तुम्ही इतके फिट कसे आहात, त्यावर अभिनेत्याने काय उत्तर दिले? तुम्हीच पाहा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘भोला’ हा दाक्षिणात्य चित्रपट ‘कॅथी’चा हिंदी रिमेक आहे. अजय-तब्बूसह राय लक्ष्मी, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा या कलाकारांच्या यामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या ३० मार्चला ‘भोला’ बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे.