बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर नेहमी चित्रपटातील भूमिकेमुळे चर्चेत असते. तसेच ती सोशल मीडियावरही अधिक सक्रीय असते. पण गेल्या काही दिवसांपासून भूमीच्या पसर्नल लाइफबाबत चर्चा रंगली आहे. भूमी पेडणेकर व्यावसायिक यश कटारियाला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. नुकताच त्या दोघांचा मुंबई विमातळावरील व्हिडीओ समोर आलेला आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत भूमी आणि यश एकत्र मुंबई विमानतळाबाहेर येताना दिसत आहेत. पण प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना पाहताच ते दोघेही वेगळे झाले. त्यानंतर पार्किंग परिसरात दोघेही एकत्र येतात आणि एकाच गाडीमधून बसून एकत्र जाताना दिसतात.

हेही वाचा – दीपिका पदुकोणनं हृतिकचा ‘तो’ फोटो केला शेअर; नेटकरी म्हणाले, “स्वस्तातला टॉम क्रूझ”

यापूर्वी भूमी पेडणेकराचा तिच्या कथित बॉयफ्रेंडबरोबरचा व्हिडीओ फेब्रुवारीमध्ये व्हायरल झाला होता. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या रिसेप्शनमधला तो व्हिडीओ होता. या व्हिडीओत भूमी आणि यश लिप लॉक करताना दिसले होते.

हेही वाचा – मराठमोळ्या अभिनेत्रीच्या चित्रपटासाठी अभिषेक बच्चन करत होता प्रॉडक्शन बॉयचं काम; किस्सा सांगत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भूमीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती ‘भीड’ या चित्रपटात शेवटची दिसली होती. ज्यामध्ये भूमी राजकुमार रावबरोबर प्रमुख भूमिकेत होती. आता भूमी ‘द लेडी किलर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंग प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.