अभिनेता रणबीर कपूरचा आगामी ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटचा प्री-टीझर ११ जूनला प्रदर्शित झाला होता. या टीझरच्या माध्यमातून हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं जाहीर करण्यात होतं. पण ‘गदर २’ व ‘ओह माय गॉड २’ या चित्रपटही याच दिवशी प्रदर्शित होणार असल्याने ‘अ‍ॅनिमल’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

त्यानंतर डिसेंबर २०२३मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं समोर आलं, पण रणबीरच्या चाहते या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होते. नुकतंच ‘अॅनिमल’च्या प्रदर्शनाची तारीख अन् नवे पोस्टरसुद्धा याच्या निर्मात्यांनी प्रदर्शित केले आहे. रणबीरचा हा बहुचर्चित चित्रपट ‘अॅनिमल’ येत्या १ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा : २०२३ हे वर्षं ठरलं बॉलिवूडसाठी लकी; वर्ष अखेरीपर्यंत हिंदी चित्रपट करणार ‘इतक्या’ कोटींची कमाई

या नव्या पोस्टरमध्ये निर्मात्यांनी रणबीरचा एक डॅशिंग लूकसुद्धा रिवील केला आहे. यात रणबीर गडद निळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. वाढलेले केस, ओठात सिगारेट, हातात लायटर अन् डोळ्यावर गॉगल असा जबरदस्त लूक यात आपल्याला पाहायला मिळत आहे. १ डिसेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबरोबरच चाहत्यांसाठी आणखी एक खुशखबर आहे. ‘अॅनिमल’चा टीझर २८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. यापुर्वी निर्मात्यांनी ‘अ‍ॅनिमल’ चा एक प्री-टीझर प्रदर्शित केला होता ज्यात रणबीरचा एक वेगळाच लूक पाहायला मिळाला होता. या टीझरला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. हा चित्रपट ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यात रणबीरसह अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी प्रमुख भूमिकेत आहेत.