गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी सेलिब्रिटी वर्षा निवासस्थानी हजेरी लावत आहेत. अलीकडेच सलमान खान आणि शाहरुख खानने एकत्र मिळून मुख्यमंत्र्यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. तसेच सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, पंकज त्रिपाठी हे देखील शिंदेंच्या घरच्या बाप्पाच्या आरतीत दंग झालेले पाहायला मिळाले. त्यानंतर आता ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. यासंबंधीचे व्हिडीओ आणि फोटो त्यांनी नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हेही वाचा – Video: संदीप पाठकच्या लेकीनं गणपती बाप्पासाठी गायलं खास गाणं; पाहा व्हिडीओ

अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो शेअर करत लिहीलं आहे की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्ही मला बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तुमच्या निवासस्थानी आमंत्रित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तसेच गणपतीची सुंदर मूर्ती दिल्याबद्दलही धन्यवाद.” दरम्यान, यावेळी अनुपम खेर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खास भेटवस्तू दिली. ही भेटवस्तू नेमकी काय आहे? ती एका स्पेशल कलाकाराने बनवली असल्याची माहिती देताना अनुपम खेर दिसत आहेत.

हेही वाचा – “अंगावर गोष्टी काढू नका”, अमृता खानविलकरने स्त्रियांना दिला महत्त्वाचा सल्ला, स्वत:च्या मावशीचा अनुभव सांगत म्हणाली…

हेही वाचा – “तू इतका सेक्सी का आहेस?” चाहतीच्या प्रश्नावर अभिनेता गश्मीर महाजनीचं उत्तर, म्हणाला….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनुपम खेर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपट उद्या प्रदर्शित होत आहे. या चित्रपटामध्ये नाना पाटेकर, पल्लवी जोशी, गिरीजा ओक असे अनेक कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. जगातली पहिली कोरोना प्रतिबंधक व्हॅक्सिन तयार करण्यामागची गोष्ट या चित्रपटातून उलगडणार आहे.