बॉलिवूडचे कलाकार यांनी आता आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हटके पद्धती वापरण्यास सुरवात केली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकार माध्यमांना मुलाखती देत असतात मात्र आता हेच कलाकार थेट जनतेला भेटू लागले आहेत. विविध कॉलेजेस, सार्वजनिक ठिकाणं या असा जागांवर जाऊन ते प्रमोशन करत आहेत. सध्या अक्षय कुमार व इम्रान हाश्मीचा ‘सेल्फी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मुंबई मेट्रोने आज लाखो मुंबईकर प्रवास करतात. यामुळे त्यांचा प्रवासाचा वेळ वाचतो. याच मेट्रोने या दोन अभिनेत्यांनी प्रवास केला आणि आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशनदेखील केले. सध्या त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात ते मास्क परिधान करून डी एन नगर मेट्रो स्थानकात जातात. मेट्रोत बसल्यावर मास्क काढतात मग लगेच लोकांनी त्यांना ओळखले.

“ती घरात…” लग्नानंतर पत्नी अथियाबद्दल के.एल.राहुलचं वक्तव्य

या प्रवासादरम्यान दोघांनी चाहत्यांबरोबर सेल्फी काढले. या चित्रपटातील’ मै खिलाडी’ या गाण्यावर मेट्रोतील प्रवाशांबरोबर थिरकताना दिसले. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ व्हायरल होताच. नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले. मागे किआरा अडवाणी, वरुण धवनने ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबई मेट्रोने प्रवास केला होता.

View this post on Instagram

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अक्षय कुमार, इम्रान हाश्मीचा ‘सेल्फी’ २४ फेब्रुवारीला ‘प्रदर्शित होणार आहे. यांच्याबरोबरच नुशरत भरूचा, डायना पेंटि या अभिनेत्रीसुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. याची निर्मिती करण जोहर आणि दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन या दोघांनी मिळून केलेली आहे. शिवाय राज मेहता यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे.