आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३चा अंतिम सामना १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या अंतिम महामुकाबल्याकडे संपूर्ण जगातील क्रिकेटप्रेमीचं लक्ष लागलं होतं. बॉलीवूड अनेक सेलिब्रिटींनी हा सामना पाहण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर हजेरी लावली होती. यादरम्यानचे व्हिडीओ, फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामधील शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या कुटुंबीयांच्या भेटीच्या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. किंग खानने रणवीरकडे दुर्लक्ष करून दीपिकाला मिठी मारल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा – अभिनेत्री दीपाली पानसरे ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत पुन्हा एकदा खलनायिकेच्या रुपात; पहिला लूक आला समोर

कोलकाता नाइट राइडर्स एक्स (ट्विटर) या अकाउंटवर शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये शाहरुख बाजूला असलेल्या रणवीरकडे दुर्लक्ष करत पहिल्यांदा दीपिकाला मिठी मारता दिसत आहे. त्यानंतर शाहरुख रणवीरला फक्त हात मिळवताना पाहायला मिळत आहे. हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. शाहरुख खानने दीपिका आणि रणवीरला दिलेल्या वेगवेगळ्या वागणुकीकडे नेटकऱ्याचं लक्ष वेधलं आहे. त्यामुळे सध्या याविषयी चर्चा रंगली आहे.

हेही वाचा – अमृता देशमुख-प्रसाद जवादेच्या लग्नात ‘या’ जोडीने वेधलं लक्ष, दोघांचे फोटो होतायत व्हायरल

हेही वाचा – ‘सहकुटुंब सहपरिवार’मधील ‘या’ अभिनेत्याची ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत एन्ट्री; झळकणार महत्त्वाच्या भूमिकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यापूर्वी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यावेळी शाहरुख खानच्या एका कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. किंग खानचा हा व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाला होता. ज्यामध्ये शाहरुख बाजूला बसलेल्या लोकप्रिय गायिका आशा भोसले यांच्या हातातील कप-बशी स्वतः ठेवायला जातो आणि त्यानंतर पुन्हा आशा भोसले यांची विचारपूस करतो. शाहरुख खानची ही कृती पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलं होतं. तसंच “एकच मनं किती वेळा जिंकशील खान साहेब” असं कॅप्शन लिहित काही जणांनी शाहरुखचा हा व्हिडीओ एक्स (ट्विट) केला होता.