पहिल्या पत्नीपासून दोन मुलं व दोन मुली अशी चार अपत्ये असूनही अभिनेते धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं. धर्मेंद्र यांनी त्यांची पहिली पत्नी प्रकाश यांच्याशी पंजाबमध्ये असताना लग्न केले होते. जेव्हा धर्मेंद्र अभिनेता व्हायचं स्वप्न उराशी बाळगून मुंबईत आले तेव्हा त्यांचा मुलगा ​​सनीचा जन्म झाला होता. सिनेसृष्टीत यश मिळवल्यावर धर्मेंद्र हेमा यांच्या प्रेमात पडले व लग्नही केलं, पण त्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नाही.

धर्मेंद्र यांच्या दोन्ही पत्नी एकमेकींना आजवर भेटलेल्या नाहीत. राजीव विजयकर यांनी ‘धर्मेंद्र: नॉट जस्ट अ ही-मॅन’ नावाचं पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात लेखकाने प्रकाश कौर यांना भेटल्याची आठवण करून दिली. त्यांनी प्रकाश यांना “एक सुंदर आणि समाधानी स्त्री” असं म्हटलंय. ते प्रकाश यांना फक्त काही मिनिटांसाठी भेटले होते. प्रकाश यांना एक गृहिणी असूनही धर्मेंद्र यांना आयुष्यात एक मजबूत आधार दिला. प्रकाश यांना त्यांच्या कुटुंबाची खूप काळजी आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ईशा देओलचे भरत तख्तानीशी लग्न होण्यापूर्वी, प्रकाश त्यांच्या सावत्र मुलीसाठी स्थळ शोधत होत्या. “सामान्य लोकांना हे अशक्य वाटेल, पण धर्मेंद्र यांनी मला एकदा सांगितलं होतं की, प्रकाश ईशासाठी चांगला मुलगा शोधत आहे,” असं लेखकाने लिहिलंय.

जेव्हा विमानतळावरून अचानक गायब झाल्या प्रकाश कौर

याच पुस्तकात लेखिकेने ज्येष्ठ पत्रकार भारती एस प्रधान यांच्या एका प्रसंगाचा उल्लेख केला होता. भारती यांनी प्रकाश कौर यांना विमानतळावर पाहिलं होतं आणि त्या बोलायला जवळ जाताच त्या गायब झाल्या होत्या. “धर्मेंद्र खूप आदराने वागायचे, पण एक लक्ष्मण रेखा होती. आम्ही त्यांच्या पत्नी किंवा मुलींच्या जवळ जाऊ शकलो नाही. आम्ही कधीही मर्यादा ओलांडल्या नाहीत. ते खूप चांगले आहेत. एकदा मी प्रकाश यांना विमानतळावर बसलेलं पाहिलं आणि मी त्यांच्याकडे बघून हसले, त्याही हसल्या पण मी तिथे जाताच त्या तिथून गायब झाल्या होत्या,” असं भारती म्हणाल्या होत्या.

ईशाच्या लग्नात गेल्या नव्हत्या प्रकाश कौर

ईशाने २०१२ मध्ये भरतशी लग्न केलं आणि २०२४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. एकेकाळी प्रकाश कौर यांनी ईशासाठी मुलगा शोधण्याचा प्रयत्न केला होता, पण पण ईशाच्या लग्नात मात्र त्यांच्या कुटुंबातील कोणीही उपस्थित नव्हतं. प्रकाश, सनी, बॉबी यापैकी कुणीच लग्नात आलं नव्हतं. देओल कुटुंबातील सर्वच लग्नात असंच चित्र पाहायला मिळालं. २०२३ मध्ये सनी देओलचा मुलगा करण देओलच्या लग्नात हेमा मालिनी व त्यांच्या मुली आल्या नव्हत्या.

hema malini with his 2 wives
धर्मेंद्र व त्यांच्या दोन्ही पत्नी (फोटो – इ्स्टाग्राम)

ईशाने यापूर्वी कबूल केलं होतं की ती तिच्या काकांना भेटायला धर्मेंद्र यांच्या घरी जायची, तेव्हा एकदा प्रकाश कौर यांना भेटली होती. “मी त्यांच्या पाया पडले आणि त्या मला आशीर्वाद देऊन निघून गेल्या,” असं ईशाने हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल या पुस्तकात लिहिलं आहे.

ईशाने याच पुस्तकात लिहिलंय की ती चौथीत असताना तिला वडिलांच्या दुसऱ्या कुटुंबाबद्दल समजलं. “तेव्हा मला समजलं की माझ्या आईने अशा व्यक्तीशी लग्न केलंय, ज्यांचं लग्न आधीच दुसऱ्या महिलेशी झालं आहे आणि त्यांचेही एक कुटुंब आहे. पण खरं सांगायचं झाल्यास मला कधीच वाईट वाटले नाही. त्यात काही चुकीचं आहे, असं मला वाटत नाही,” असं ईशाने म्हटलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकाश कौरबद्दल हेमा मालिनी म्हणालेल्या, “मी प्रकाशबद्दल कधीच काहीही बोलत नाही, पण मी त्यांचा खूप आदर करते. माझ्या मुलीही धरमजींच्या कुटुंबाचा आदर करतात. लोकांना माझ्या आयुष्याबद्दल बरंच काही जाणून घ्यायचंय, पण ते सर्वांना ते कळणं गरजेचं नाही.”