अभिनेता आयुष्मान खुराना सध्या त्याच्या ‘ड्रीम गर्ल २’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून निर्मात्यांनी या चित्रपटाचे अनेक पोस्टर्स सोशल मीडियावर शेअर केले होते. आता नुकताच ‘ड्रीम गर्ल २’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

हेही वाचा : “गोरेगाव ते ठाणे घोडबंदर रॉक्स…”, मुंबईच्या वाहतूक कोंडीत साडेतीन तास अडकला मराठमोळा अभिनेता, शेअर केली पोस्ट

‘ड्रीम गर्ल २’ हा आयुष्मान खुरानाच्या २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्रीम गर्ल’चा सीक्वेल आहे. ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटाचे संपूर्ण कथानक ‘पूजा’ या पात्रावर आधारलेले आहे. आयुष्मान चित्रपटात स्त्रीवेश परिधान करून पूजाचे पात्र साकारतो. ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्यामुळे आता प्रेक्षकांना ‘ड्रीम गर्ल २’ कडूनही अपेक्षा आहेत.

हेही वाचा : अनन्या पांडेबरोबरच्या व्हायरल फोटोंवर आदित्य रॉय कपूरने सोडलं मौन; म्हणाला, “सोशल मीडियावर…”

‘ड्रीम गर्ल २’च्या ट्रेलरमध्ये आयुष्मान खुराना कर्जबाजारी झाल्यामुळे पुन्हा एकदा पूजाचा स्त्रीवेश परिधान करून गाणी गाण्यास, फोनवर बोलण्यास सुरुवात करतो असे दाखवण्यात आले आहे. त्याच्यासह अभिनेत्री अनन्या पांडे यामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करत आयुष्मानने “ट्राफिक जॅम होणार कारण चार वर्षांनी ड्रीम गर्ल पूजा येणार…” असे कॅप्शन दिले आहे.

हेही वाचा : “७२ वर्षांचा हिरो अन् ३३ वर्षांची हिरोईन”, तमन्ना भाटियाने ट्रोलर्स दिले सडेतोड उत्तर; म्हणाली, ” वयाने काय फरक…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ड्रीम गर्ल २’ चित्रपटात आयुष्मान खुराना आणि अनन्याबरोबर परेश रावल, असरानी, राजपाल यादव, मनजोत सिंग आणि अनु कपूर यांसारखे अनुभवी कलाकार देखील दिसणार आहेत. यापूर्वी हा चित्रपट २५ जुलैला रिलीज होणार होता पण, काही कारणास्तव निर्मात्यांनी तारीख बदलून आता ‘ड्रीम गर्ल २’ २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.