इंडिया रिच लिस्ट २०२५ (हुरुन इंडिया) नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीत मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय पहिल्या स्थानावर आहेत, त्यानंतर गौतम अदानी आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. या यादीत बॉलीवूड सेलिब्रिटींची नावं देखील आहेत. शाहरुख खान सर्वात श्रीमंत अभिनेता ठरला आहे. त्याचबरोबर जुही चावला सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे.

या यादीतील एका नावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या यादीत एका बॉलीवूड अभिनेत्रीच्या पतीचं नाव आहे. त्यांची संपत्ती शाहरुख खान, हृतिक रोशन, अमिताभ बच्चनसह टॉप पाच बॉलीवूड अभिनेत्यांच्या एकूण संपत्तीपेक्षा जास्त आहे. या श्रीमंत व्यक्तीचं नाव विकास ओबेरॉय आहे आणि ते अभिनेत्री गायत्री जोशीचे पती आहेत. विकास ओबेरॉय यांची एकूण संपत्ती ४२,९६० कोटी रुपये आहे.

कोण आहेत गायत्री जोशीचे पती?

या यादीत आणखी एका बॉलीवूड स्टारने स्थान मिळवले आहे. स्वदेस फेम अभिनेत्री गायत्री जोशी व तिचे पती विकास ओबेरॉय. विकास ओबेरॉय यांची एकूण संपत्ती ४२,९६० कोटी रुपये आहे. भारतातील टॉप १०० श्रीमंत व्यक्तींमध्ये तो ५८ व्या क्रमांकावर आहे आणि रिअल इस्टेट उद्योगात चौथ्या क्रमांकावर आहे.

विकास हे ओबेरॉय रिअल्टीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांच्या कंपनीने मुंबईत अनेक लक्झरी प्रकल्प विकसित केले आहेत. सर्वात लोकप्रिय म्हणजे 360 वेस्ट अपार्टमेंट्स, जिथे एका घराची किंमत सुमारे ४०० कोटी रुपये आहे. अनेक बॉलीवूड स्टार आणि प्रमुख उद्योगपती येथे राहतात. ओबेरॉय रिअल्टीकडे वेस्टिन हे लक्झरी हॉटेल आणि अनेक लक्झरी प्रकल्प आहेत.

gayatri-joshi
गायत्री जोशी व विवेक ओबेरॉय

टॉप 5 श्रीमंत बॉलीवूड स्टार्स

  • शाहरुख खान – १२,४५० कोटी (रेड चिलीज एंटरटेनमेंट, आयपीएल, प्रॉडक्शन हाऊसमधून कमाई)
  • जूही चावला व कुटुंबीय – ७,७९० कोटी (IPL टीम कोलकाता नाइट रायडर्सच्या भागीदारीतून कमाई व इतर व्यवसाय)
  • हृतिक रोशन – २,१६० कोटी (HRX ब्रँड व सिनेमातून कमाई)
  • करण जोहर – १,८८० कोटी (धर्मा प्रॉडक्शन्स)
  • अमिताभ बच्चन व कुटुंब – १,६३० कोटी (गुंतवणूक व ब्रँडमधून कमाई)

या पाच जणांची एकूण संपत्ती २५,९५० कोटी रुपये आहे. तर, दुसरीकडे विकास ओबेरॉय एकटेच ४२,९६० कोटी रुपयांचे मालक आहेत.

कोण आहे गायत्री जोशी?

२००० मध्ये गायत्री जोशी फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल ठरली होती. तिने शाहरुख खानबरोबर स्वदेस (२००४) चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटाने तिला खूप लोकप्रियता मिळवून दिली. पण नंतर तिने लग्न केलं आणि सिनेसृष्टीला अलविदा केलं. ती पतीबरोबर व्यवसाय सांभळते. सध्या ती ओबेरॉय रिअॅल्टीची संचालक आहे आणि कंपनीची एक प्रमुख सदस्य आहे. ती सोनाली बेंद्रे आणि सुझान खान यांची खास मैत्रीण आहे.

गायत्री जोशीचे पती विकास ओबेरॉय यांची एकूण संपत्ती ४२,९६० कोटी रुपये आहे. विकास ओबेरॉय हे भारतातील ५८ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची संपत्ती शाहरुख खान, जुही चावला, हृतिक रोशन, करण जोहर आणि अमिताभ बच्चन यांच्या एकत्रित संपत्तीपेक्षा जास्त आहे.